*शेतकऱ्यांना कर्ज देताना कंजुषी का?- खा. ओमराजे निंबाळकर*
दि. 13 - उस्मानाबाद -
*' स्केल ऑफ फायनान्स' दर्शनी भागावर लावा* - यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबा ळकर यांनी प्रत्येक बँकांनी शेतकऱ्यांना देय असलेला 'स्केल ऑफ फायनान्स आपल्या शाखेतील दर्शनी भागात लावावा. यामध्ये पीक, क्षेत्र नमूद करावे. आगामी पाच दिवसाच्या आत हे करावे. सहाय्यक निबंधक यांनी यासंबंधी जीओ टंगींग करून फोटोसह अहवाल सादर करावा, निर्धारीत वित्तीय मर्यादेनुसार कर्ज पुरवठा होतोय का, याची खातरजमा करावी असे, असे सूचित केले.
शेतीला पुरेसा अन् वेळेवर कर्जपुरवठा होत नसल्यानेच शेती विकास होत नाही. शेतकऱ्यांवर सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ येते. शेतकऱ्यांनाच कर्जवाटप करताना एवढी कंजुषी कशासाठी, असा सवाल करत सर्व बँकांनी स्केल ऑफ फायनान्स' प्रमाणे कर्जपुरवठा करावा, अशा सूचना खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केल्या.
येथील पंचायत समिती सभागृहात सोमवारी खा. राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी खरीप कर्जवाटप आढावा बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी निलेश विजयकर, गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू, सहायक निबंधक विकास जगदाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, पं. स. उपसभापती गुणवंत पवार यांच्यासह तालुक्यातील सर्व बैंकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिक्षक मेजर परी यांनी प्रास्तविक केल्यानंतर खा. राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी खरीप हंगामातील बँकनिहाय कर्जवाटपाची स्थिती जाणून घेतली. तसेच शेतकरी, बैंक कर्मचारी व सहकार, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधत येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. यावेळी मस्सा, शिराढोण, आथर्डी, वाकडी (के) आदी गावातील शेतकऱ्यांनी बँका कर्जवाटपात अडवणूक करत असल्याच्या तक्रारी केल्या. खासदार, आमदार यांनी मागणी केलेला एकही शेतकरी कर्ज वाटपापासून वंचित राहू नये, अशी मागणी बैंक व्यवस्थापनाकडे केली.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.