*सारोळ्यात दहा बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू*
दि. 13 - उस्मानाबाद -
तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे स्वयंम शिक्षण प्रयोग व ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गावातील जिल्हा परिषद शाळेत दहा बेडचे अद्ययावत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले तसेच माजी मंत्री आ. राणाजगतिसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधी मधून बांधण्यात येत असलेल्या सभागृह कामाचेही भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.
या आयसोलेशन सेंटरमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. याठिकाणी १० बेडची व्यवस्था असून, अद्यावत अशी सुविधा देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत हे गाव कोरोनामुक्त आहे. मात्र, संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यास गैरसोय होऊ नये, यासाठी सरपंच प्रशांत रणदिवे यांच्या पाठपुराव्यांतून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.
गावातील मागासवर्गीय वस्तीमध्ये सभागृह उभारण्याची मागणी समाजबांधव गत १५ वर्षांपासून करत होते. त्याची दखल घेत आ राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार स्थानिक विकास निधीमधून १० लाखांचा निधी मंजूर केला आहे.
या सभागृह कामाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सभापती दत्तात्रय देवळकर, गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ सुमित काकडे, स्वयंम शिक्षण प्रयोग किरण माने, नसीम मॅडम, मुजावर सरपंच प्रशांत रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, सुधाक देवगिरे, सावन देवगिरे, तंटामुक्त= समितीचे अध्यक्ष सुरेश देवगिरे रमेश रणदिवे, दलितमित्र पांडुरंग कठारे, अमर बाकले, भालचंद्र कठारे खंडू शिंदे, रावसाहेब मसे, प्रदीप वाघ, ग्रामसेवक योगेश मुंढे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.