*उस्मानाबाद पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर*
दि. 13 - उस्मानाबाद -
सातवा वेतन : आयोगातील सुधारित वेतन श्रेणीतील फरकाच्या थकबाकीचा पहिला हप्ता तातडीने मिळावा, या प्रमुख मागणीसाठी नगर परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १२ जुलैपासून पालिका कार्यालयासमोर बेमुदत संप सुरू केला आहे. या आंदोलनामुळे पालिकेचे दिवसभर कामकाज ठप्प झाले होते.
या प्रमुख मागणीसाठी उस्मानाबाद पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने बेमुदत संप सुरू केला आहे. या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज दिवसभर ठप्प होते.
राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायत तील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनश्रेणी लागू करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार वेतनश्रेणी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन 1 सप्टेंबर 2019 पासून मान्यता मिळालेली आहे 1 जानेवारी 2016 ते 31 सप्टेंबर 2019 कालावधीतील 2019-20 पासून समान पाच वार्षिक हप्त्यात देण्यास मान्यता आहे. त्यानुसार उस्मानाबाद नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष वेतन 1 सप्टेंबर पासून देण्यात आलेला आहे, तर 1 जानेवारी 2016 ते 31 ऑगस्ट 2019 या कालावधीतील या थकबाकीचा एकही हप्ता अद्यापपर्यंत देण्यात आलेला नाही.
मागील दोन वर्षापासून राज्यासह जिल्ह्यांमध्येही कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्याने व नगरपरिषदांच्या सेवा या अत्यावश्यक असल्याने इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे उपस्थिती च्या अनुषंगाने कोणतीही सवलत दिली नाही. त्यामुळे कार्यालयात 100% उपस्थिती होती. दरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झपाट्याने वाढ होत असतानाही दोन वर्षापासून महागाई भत्ता मिळालेला नाही, त्यातच सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पहिला हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही, वरील मागणी तातडीने मार्गी लावावी, या प्रमुख मागणीसाठी उस्मानाबाद पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने बेमुदत संप सुरू केला आहे. या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज दिवसभर ठप्प होते.
या आंदोलनात नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक तानाजीराव तावडे, सचिव रावसाहेब अंबादास शिंगाडे, मार्गदर्शक संभाजी राजेनिंबाळकर, उपमुख्य अधिकारी पृथ्वीराज पवार, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी, भारत साळुंके, सेवानिवृत्त कर्मचारी मोहन देशपांडे, उमाकांत राऊत यांच्यासह शंभरावर कर्मचारी सहभागी झाले होते.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.