जिल्हयतील सर्व शासकीय रुग्णालयांत
नॉन कोविड सेवा पूर्ववत सुरु
लातूर,दि.23(जिमाका):-राज्यात तसेच लातूर जिल्हयात मागील दीड वर्षापासून कोविड-19 या आजाराची साथ सुरु आहे. या साथीच्या काळात सर्व शासकीय रुग्णालयामध्ये व काही खाजगी रुग्णालयामध्ये कोविड बाधित रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत. या काळात जिल्हयातील नॉन कोविड रुग्णांना सेवा पुरविताना काही अडचणी निर्माण झाल्याची शक्यता आढळून आली.
सध्यस्थितीत या कार्यालयांतर्गत सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी कोविड बाधित रुग्ण् दाखल नसुन सर्व रुग्णालयामध्ये नॉन कोविड सेवा पूर्ववत सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये गरोदर मातांची नोंदणी व तपासणी, गरोदर मातांचे लसीकरण, बालकांचे नियमित लसीकरण, सर्व असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व र्गर्भनिरोधक साधनांच्या वापराबाबत समुपदेशन व वितरण,वृध्द नागरिकांची स्वतंत्र तपातसणी, नातेवाईकांची ओपीडी, निदान व उपचार, रेत्र शस्त्रक्रिया, सर्वसाधारण बाहयरुग्ण् तपासणी, आयुष विभागाअंतर्गत तपासणी व उपचार इ. सर्व नॉन कोविड सेवा सर्व शासकीय रुग्णालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या आहेत, तरी लातूर जिल्हयातील सर्व रुग्ण् व नागरिकांनी नॉन कोविड आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.