*पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अवैध धंद्यावर छापेमारी.1,04,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त. 05 गुन्हे दाखल*


                *पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची  अवैध धंद्यावर छापेमारी.1,04,000/- रुपयांचा मुद्देमाल  जप्त. 05  गुन्हे दाखल*






लातूर प्रतिनिधी 

                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23/07/2021 रोजी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, पोलिस उपअधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यावर कार्यवाही करीत असताना विशेष पथकाला माहिती मिळाली की , टाऊन हॉल चे पाठीमागील रोडवर एक इसम विनापास परवाना देशीदारूची अवैध विक्री/ व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणार आहे. अशी माहिती मिळाल्याने विशेष पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला. 

                माहिती प्रमाणे मोटरसायकल वर एक इसम पांढऱ्या पोत्यामध्ये काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसला.त्यास थांबवून पांढरे पोते उघडून पाहिले असता त्यामध्ये  देशी दारूच्या बाटल्या दिसून आल्या. त्यास देशीदारू विक्री परवाना बाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितल्याने आरोपी नामे

1) अजय चंद्रकांत म्हस्के, वय 22 वर्ष, राहणार-पटेल नगर, लातूर.

याचे विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे *गुरनं.285/21* ,कलम 65 (अ )( ई ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याच्याकडून अवैध विक्री/व्यवसाय साठी घेऊन जात असलेला दारूचा मुद्देमाल व पल्सर मोटरसायकल क्रमांक एम. एच. 24 टी 0529 असा एकूण 64,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन करत आहे.


                      तसेच विशेष पथकाने त्यांना मिळालेल्या माहितीवरून नवीन रेणापूरनाका ते साई रोड वरील एका कापड दुकानाच्या समोरून अवैध विक्री/व्यवसाय साठी दारूचा माल घेऊन जात असताना एका मोटरसायकलस्वारला थांबवून त्याच्याकडून देशीदारूच्या बाटल्या व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली लूना मोटरसायकल क्रमांक एम. एच.24  ए. ए.8530 असा एकूण 28984/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर इसम नामे

1) नवनाथ केरबा घोडके, वय 45 वर्ष, राहणार- नांदगाव ता. जि. लातूर याचे विरुद्ध पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे *गु र नं* *447/21* कलम. 65 (अ )( ई ) 8,3 महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


                पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करत आहे.

                       तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निलंगा येथील  मौजे मसलगा शिवारात हनुमंतवाडी ते निलंगा जाणारे रोडवर एक इसम विनापास परवाना देशीदारूची अवैध विक्री/ व्यवसाय करण्यासाठी देशीदारू बाळगून आहे. अशी माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी देशीदारूचे  बॉक्स व बाटल्या एकूण किंमत 3,600/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.सदरचा मुद्देमाल जप्त केला आहे. देशीदारूची अवैध विक्री/व्यवसाय  करणारा इसम नामे

1) माधव प्रल्हाद रुबदे, वय 38 वर्ष राहणार-हनुमंतवाडी ता. निलंगा

 हा मिळून आला.त्याच्याकडे दारूविक्री परवाना बाबत विचारले असता त्याने त्याच्याकडे दारूविक्री  परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून सदर इसमा विरोधात पोलीस ठाणे निलंगा येथे *गुरनं. 210/2021* कलम. 65(अ)(ई),महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


                       त्याच ठिकाणी विनापास परवाना देशीदारूची अवैध विक्री/ व्यवसाय करण्यासाठी देशीदारू बाळगून असलेला इसम नामे 

1) शाहूराज गणपती तुरे, वय 40 वर्ष राहणार -लांबोटा तालुका निलंगा

 हा मिळून आल्याने  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून  देशीदारूचे  बॉक्स व बाटल्या एकूण किंमत 4860/- रुपयाची दारू मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त केला आहे.

                    सदर इसमा विरोधात पोलीस ठाणे निलंगा येथे *गुरनं.212/2021* कलम. 65(अ)(ई),महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


                तसेच  सदर पथकाने  निलंगा येथील लांबोटापाटी ते लांबोटा गावात जाणारे सार्वजनिक रोडवर एका दुकानासमोर थांबून लोकाकडून पैसे घेऊन आकड्यावर कल्याण मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने आरोपी नामे

1) समाधान शाहूराज तुरे, वय 16 वर्ष, राहणार-लांबोटा तालुका निलंगा.

 यांचेकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 3,210/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यांचे विरुद्ध  *_निलंगा  येथे गुरनं. 211/2021 कलम.12 (अ)  महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे._*~ 


               तिन्ही गुन्ह्याचा पुढील तपास निलंगा पोलिस स्टेशनचे  पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या