*दोनशे विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत*
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
दि. - 9 - उस्मानाबाद -
उस्मानाबाद येथील कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल मध्ये चालू शैक्षणिक वर्ष 2021- 22 या वर्षात भटक्या जमाती(क) प्रवर्गातील धनगर समाजातील 200 विद्यार्थ्यांना इ. 01 ली व इ. 02 री मध्ये( इंग्रजी माध्यम) मोफत प्रवेश देऊन इ. 12 वी पर्यंत इंग्रजी माध्यमातून मोफत निवासा सह शिक्षणाची सोय करण्यात आली आहे.
उस्मानाबाद परिसरातील धनगर समाजातील पालकांनी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, पालकांची उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, विद्यार्थ्याचे दोन फोटो तसेच आधार लिंक असलेला मोबाईल नंबर यासह सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, छाया दीप लॉन्स येडशी रोड उस्मानाबाद येथे समक्ष भेटून माहिती घ्यावी असे आवाहन कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्रा. डॉक्टर रमेश दाबके- देशमुख यांनी केले
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.