देवळाली येथे स्वयं शिक्षण प्रयोग व क्राफ्ट रिलीफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना अन्नधान्य किट वाटप*

 *देवळाली येथे स्वयं शिक्षण प्रयोग व क्राफ्ट रिलीफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना अन्नधान्य किट वाटप*





 *उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद* 


दि. 9 - उस्मानाबाद - देवळाली येथे स्वयं शिक्षण प्रयोग उस्मानाबाद व क्राफ्ट रिलीफ इंडिया संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

कोरोना 19 मुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत गावातील गरजू कुटुंबांना मदत मिळावी यासाठी स्वयंम शिक्षण योगाचे तालुका अध्यक्ष अंजना साबळे यांनी पुढाकार घेऊन मदत स्वरूपात किराणा किट चे वाटप केले. कोरोना काळात हे मदत मिळाल्यामुळे महिलांनी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या संचालक प्रेमा गोपालन, प्रोग्राम डायरेक्टर उपमन्यु पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर तबस्सुम मोमीन, जिल्हा व्यवस्थापक माधव गोरं गटे यांचे आभार मानले


यावेळी अशोक पाटील, आणि सतीश गुंड, सरपंच अविनाश अच्युत, उप सरपंच अजित सिंह पाटील यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले. स्वयं शिक्षण प्रयोग चे सुपरवायझर अंजना साबळे व लीडर जिजाबाई जाधवर कार्यक्रमास उपस्थित होत्या.


*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा


बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170


Mail :Laturreporter2012@gmail. com


Web :www.laturreporter.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या