महागाई कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा- छावा ची मागणी *

 *महागाई कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा- छावा ची मागणी 



*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*


दि. 9 - उस्मानाबाद -


इंधनाच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकरी, व्यापारी, कामगार तसेच सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे त्यामुळे छावा संघटनेच्या सरकारचा निषेध करीत महागाई तात्काळ कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात व्यक्त केली. उपविभागीय अधिकाऱ्यांना आज हे निवेदन देण्यात आले, यात म्हटले आहे की सततच्या इंधन दरवाढ मुळे व महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे व्यापार ठप्प झाले आहे नोकऱ्या गेल्याने नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे वैद्यकीय खर्चात बेफाम लूट चालू आहे

व्यापा-यांना संचार बंदी चे नियम पळून व्यवसाय करता येत नाही असे असताना सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे असे असतानाही वेगवेगळ्या बहाण्याने होंडा च्या नावाखाली नागरिकांची व व्यापाऱ्यांची सरकारतर्फे लूट चालू आहे आणि त्यातच महागाई चा डोंगर वाढतच चालला आहे. सरकारने महागाई नियंत्रणात आणावी अन्यथा छावा संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात केला आहे, यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब माने, पृथ्वीराज चव्हाण, रणजीत बिराजदार, वजीर शेख, नागेश सगर, चंद्रकांत मुगळे, चांद फकीर, कृष्णा जमादार उपस्थित होते.


*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा


बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170


Mail :Laturreporter2012@gmail. com


Web :www.laturreporter.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या