*भाजपाचा आरक्षण मुक्तीचा छुपा अजेंडा: काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
दि. 10 - उस्मानाबाद -
केंद्र सरकारने राष्ट्रीय कंपन्यांचे खाजगीकरण करून नोकऱ्यांची आरक्षण संपुष्टात आणले केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेला 2013मधील एम्पिरिकल डेटा सरकारने राज्य शासनास कोर्टात सादर करण्यास न दिल्याने राजकीय आरक्षण रद्द झाले आहे
आरक्षण मुक्त भारत करण्याचा आरएसएसचा छुपा अजेंडा असून भाजपच्या माध्यमातून तो राबविला जात आहे असा आरोप काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या लढ्या बाबत दिशा ठरविण्यासाठी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत, ते आज उस्मानाबाद दौऱ्यावर आले आहेत त्यांनी त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पत्रकारांची सांगितले ओबीसीचे आरक्षण रद्द होण्यासाठी केंद्र सरकारच यशस्वी जबाबदार आहे. केंद्राने राज्यास एम्पिरिकल डाटा दिला असता, तर आरक्षण रद्द झाले नसते. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे, या आयोगामार्फत एम्पिरिकल डाटा जमा करण्याची प्रक्रिया असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आरएसएसचा आरक्षण मुक्त भारत करण्याचा छुपा अजेंडा असून भाजप सरकारच्या माध्यमातून तो राबविला जात आहे राष्ट्रीय कंपन्यांचे खाजगीकरण करून नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपुष्टात आणले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केले आहे, त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींना ग्रामपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढविता येणार नाहीत शासनाच्या या धोरणामुळे संपूर्ण देशातील ओबीसी बांधव पेटून उठला आहे असे या वेळेत यांनी आपले मनोगत व्यक्त केले
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.