प्रलंबित घरकुलांना मान्यता द्या :वंचित बहुजन आघाडी *

 *प्रलंबित घरकुलांना मान्यता द्या वाचा सविस्तर*


*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*





 उस्मानाबाद 


शहरातील प्रधानमंत्री आवास तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या घरकुलांना तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली, शहरातील अनेक पात्र लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत, मात्र नगरपंचायत इकडून अशा प्रस्तावांना घरकुलाचे बांधकाम करण्यास परवानगी आतापर्यंत दिलेली नाही. संबंधित लाभार्थी चौकशी करण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी कोविड-19 कारण सांगितले जात आहे, नगरपंचायत अशा कारणामुळे लाभार्थी नागरिकांना हक्कांपासून वंचित आहेत. प्रशासनाने प्रलंबित घरकुलांना तातडीने मंजुरी द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात येईल काय इशारा देण्यात आला, निवेदनावर जयपाल सुकाळे, बालाजी बनसोडे, प्रशांत सुकाळे, सुजित हजारे, अनिकेत बनसोडे, रोहन गायकवाड आदी उपस्थित होते.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा


बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170


Mail :Laturreporter2012@gmail. com


Web :www.laturreporter.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या