अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशात सत्तेत आलेल्या भाजपामुळे सर्वात वाईट दिवस लोकांना पहावे लागत आहेत त्यामुळे आगामी काळातील निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कार्यरत व्हावे

 

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशात सत्तेत आलेल्या भाजपामुळे  सर्वात वाईट दिवस लोकांना पहावे लागत आहेत त्यामुळे आगामी काळातील निवडणुकामध्ये  काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कार्यरत व्हावे

 

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे

 

 मोघे यांच्या उपस्थितीत लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी  लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न






लातूर प्रतिनिधी:

पंतप्रधान मोदींनी दिलेले एकही आश्वासन या सात वर्षाच्या काळामध्ये पाळले नाहीशेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देऊ म्हणणारे मोदी सरकार  तीन कृषी  कायदे आणून शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे.कोरोना विरुद्धही लढताना केंद्र सरकारला अपयश आलेअच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशात सत्तेत आलेल्या भाजपामुळे  सर्वात वाईट दिवस लोकांना पहावे लागत आहेत त्यामुळे आगामी काळातील निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कार्यरत व्हावे असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी  लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक  प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत  लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे शुक्रवार दिनांक  जुलै रोजी  संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले कि  मोदी सरकारची नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहेइंदिरा गांधींना नाव ठेवणाऱ्या भाजपाला हे लक्षात नाही की इंदिरा गांधी यांनी 22 कल्मी कार्यक्रमातून लोकांच्या जीवनात प्रकाश आणला.भूमिहीन लोकांना जमिनी दिल्या त्यांना घरे दिली आजही इंदिरा आवास योजना त्याचेच द्योतक आहे.

 

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रात सगळ्यात जास्त म्हणजे अडीच हजार बॅग रक्त संकलन करून महाराष्ट्रात एक नवीन पॅटर्न घालून दिला याचाही विशेष उल्लेख त्यांनी केलातसेच लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने अन्नदानाचा केलेला उपक्रम हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील काँग्रेसच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा उपक्रम ठरला लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देऊन  विलासराव देशमुख यांच्यासारखा मुख्यमंत्री होणे नाही असेही ते म्हणाले.

कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भूमिका वेळोवेळी लोकांसमोर मांडाव्या पक्ष मजबुतीकरणासाठी काम करावे प्रदेश काँग्रेस कमिटी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची दखल घेईललातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी  लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असून माझ्या सदैव शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी लातूर जिल्हा काँग्रेसला लोकनेते विलासराव देशमुख ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा वारसा आहे आणि तोच वारसा पुढे घेऊन पालकमंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे काम करत आहे असे प्रतिपादन केले.लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने काम करत असताना सध्या लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद येत्या काळात काँग्रेसच्या ताब्यात आणू आणि आम्ही परत एकदा काँग्रेस पक्षाला जिल्ह्यामध्ये गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार महर्षी दीलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने काम करू असे आश्वस्त केले.अध्यक्ष झाल्यापासून जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या विविध 19 सेल कार्यान्वित करण्यात आल्या आहेतया विभागामार्फत काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे आणि उपक्रम जिल्हा भरा मध्ये पोहोचवण्याचे काम सुरू आहे असेही यावेळी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडकिरण जाधव यांनी   प्रास्ताविकात  लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी  जिल्हा काँग्रेस कमिटीने गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या राजकीय सामाजिक कार्याचा अहवाल त्यांनी मांडला तसेच लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 31 दिवस अन्न सेवेच्या पार पडलेल्या महायज्ञा बद्दल माहिती दिली तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेले रक्तदान शिबिर हे प्रदेशातील सर्वात मोठे रक्तदान शिबिर झाले याचीही आठवण त्यांनी याप्रसंगी करून दिली.. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी  लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विरोधी केंद्र सरकारने आणलेल्या काळ या कायद्याचा विरोध म्हणून जी ट्रॅक्टर रॅली लातूर ने काढली त्यालाच समोर ठेवून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्ह्याजिल्ह्यात अशा  ट्रॅक्टर रॅली काढण्यासंदर्भात सूचना केल्या हेही त्यांनी या प्रसंगी आवर्जून सांगितले... येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत 50 पेक्षा अधिक नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतील अशी ग्वाही त्यांनी दिली .

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व्यंकट बेद्रे यांनी काँग्रेस पक्षाच्या इतिहासाची उजळणी करत कार्यकर्त्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीने बळ देण्याचे आवाहन केले.. लोकनेते विलासरावजी देशमुख आणि मोघे साहेब यांच्या मैत्रीचा उल्लेख त्यांनी केला.

 

युवा नेते अभय साळुंके यांनी याप्रसंगी बोलताना अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा देशाचे नेते राहुलजी गांधी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पक्षाला बळ देण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि पक्ष सांगेल ते धोरण घेऊन पक्षाला बळ देण्याचे कार्य आम्ही सतत करत राहू असा शब्द त्यांनी दिलायावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी  लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

               ---------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या