लातूर भाजी मार्केट स्थलात्तराच्या मागणी बाबत सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वमान्य तोउगा काढावा
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी (शुक्रवार दि. ९ जूलै २१):
लातूर येथील भाजी मार्केट स्थलांतरा बाबत व्यापाऱ्यांची मागणी आणि कृषी उत्पन्न् बाजार समितीची व्यवहार्यता तपासून या संदर्भाने नियुक्त केलेल्या समितीने सर्व घटकांना मान्य होईल असा सर्वमान्य निर्णय घ्यावा, अशी सुचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
लातूर शहरातील भाजी मार्केट बाहयवळण रस्त्यावर स्थलांतरीत करण्या बाबत संबंधित व्यापाऱ्यांनी केलेली मागणी, यामध्ये असलेली मतमत्तातरे त्याच बरोबर बाहयवळण रस्त्यावरील जागेत सध्या सुरू असलेला कडबा आणि जनावरांचा बाजार या संदर्भाने असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची भुमिका, शिवाय हे भाजी मार्केट स्थलातरीत करायचे ठरले तर नवीन ठिकाणी उभाराव्या लागणाऱ्या सुविधा या बाबींचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या सुचनेवरून बाजार समिती संचालक मंडळातील ज्येष्ठ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सदरील समिती सोबत आज पालकमंत्री ना. देशमुख यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे मंत्रालयातुन आढावा बैठक घेतली.
बैठकीच्या प्रारंभी ना. देशमुख यांनी सर्व समिती सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेतले त्यांनतर भाजी मार्केट मधील व्यापारी यांची मागणी, त्यांच्यातील मतमतात्तरे, जुन्या भाजी मार्केट मधील जागा, तेथे विस्तार करण्यासाठी असलेला वाव, नवीन ठिकाणी उभाराव्या लागणाऱ्या सुविधा, त्यासाठी लागणारा वेळ, कडबा व जनावर बाजारासाठी शोधावा लागणारा पर्याय या संदर्भातील बाजार समितीची भुमिका या गोष्टीचा अभ्यास करावा, सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी व सर्वमान्य निर्णय घ्यावा, अशा सुचना पालकमंत्री देशमुख यांनी केल्या आहेत.
या आढावा बैठकीस बाजार समितीचे सभापती ललीतभाई शहा, उपसभापती मनोज पाटील, संचालक सुधिर गोजमगुंडे, विक्रम शिंदे, रावसाहेब पाटील, गोविंद नरहरे, भास्कर शिंदे, श्री बिदादा तसेच संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
-------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.