आज पंचायत समिती सभागृह, #औसा येथे *शहरी व ग्रामिण भागातील वीजपुरवठा तक्रारी संदर्भात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.*
औसा प्रतिनिधी
औसा व निलंगा तालुक्यात सद्या कार्यरत असलेल्या सबस्टेशन वरिल अतिरिक्त लोड चा सर्व्हे करावा. ज्या सबस्टेशन वरती अतिरिक्त लोड आहे. तेथे नविन पावर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावेत. जेणे करून वीज प्रवाहाचा दबाव योग्य राहील व सबस्टेशन फिडर वर लोड येणार नाही. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व लाईन सर्व्हे करून लाईनवर येणारे झाडे व फाटे किरकोळ कामे तात्काळ करण्यात यावेत.
प्रत्येक महिन्याला ग्राहकांना वीज बिल देण्यात यावेत. वीज ग्राहकांच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे पिकांचे उत्पन्न निघेल तेव्हाच कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांनी वीज ग्राहक वसुली साठी मेळावे घेण्यात यावेत. वीज ग्राहकांकडून झालेल्या वसुलीतून त्याच भागात दुरुस्तीची कामे करावीत. पत्राद्वारे केलेल्या शिफारशी व कामे प्राधान्याने करावीत.
ज्या लाईन स्टाफच्या जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी तात्काळ १८ जुलै पर्यंत कंत्राटी लाईनमन भरण्यात याव्यात. अशा संबंधित विभागास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुचना केल्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, तालुकाप्रमुख सतिष शिंदे, उपतालुका प्रमुख श्रीधर साळुंखे, श्रीमती जयश्री उडगे ताई, सुरेश भोरे, माजी नगरसेवक बंडू गोदरे, रोहित गोमदे-पाटील, अधिक्षक अभियंता दिलीप भोळे, शिवसेना विधानसभा संघटक शेखर चव्हाण, कार्यकारी अभियंता विष्णु ढाकणे, उपकार्यकारी अभियंता श्री.जाधव, किल्लारीचे उप कार्यकारी अभियंता श्री.इंगळे, निलंगाचे उप कार्यकारी अभियंता श्री.पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे, मिडिया प्र
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.