नांदगाव येथील मुख्य रस्त्याची दुरावस्था
बेशरमाचे झाड लावून ग्रामस्थांचे गांधी आंदोलन
जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध
बेशरमाचे झाड लावून ग्रामस्थांचे गांधी आंदोलन
जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध
लातूर - येथून जवळच असलेल्या नांदगाव येथील गावात येणारा मुख्य रस्त्याचे काम होऊन अनेक दिवस झाले. रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडल्याने गरोदर मातांना या रस्त्याने प्रवास करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार यांच्या साफ दुर्लक्षामुळेच या रस्त्याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नाही विशेष बाब म्हणजे या गटातील जिल्हा परिषद सदस्य शोभा पंडीत ढमाले यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी गावातील ग्रामस्थांनी निष्क्रिय प्रशासनाचा निषेध नोंदवत बेशरम रस्त्यात लावून गांधीगिरी आंदोलन केले.
यावेळी कैलास जगताप, सिदाजी जगताप, राजाभाऊ माने, कैलास साळुंके, बापूराव साळुंके, अशोक पाटील, आप्पा सातपुते, भाऊ गव्हाणे, सिद्राम माने, व्यंकट घोडके, रामा ढमाले, प्रवीण गर्जे, छोटूमिया शेख, मन्सूर चाऊस, धीरज पाटील, अजय कोटीवाले, रणजीत पाटील, अविनाश शेळके, नितीन धुमाळ, सचिन सुर्यवंशी, विकास जगताप, मुकेश शिंदे, बिरू काळे, निलेश शिंदे, खय्युम शेख, अविनाश जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.