लातूर जिल्हयात डेंग्यु व साथरोग नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणानी युध्दपातळीवर उपाययोजना राबव्यात पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

 लातूर जिल्हयात डेंग्यु व साथरोग नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणानी युध्दपातळीवर उपाययोजना राबव्यात 

 पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख










 लातूर प्रतिनिधी (मंगळवार दि. २७ जूलै २१)
   पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता लातूर जिल्ह्यात डेंग्यु व इतर साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्ध पातळीवर राबवण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
   कोरोना प्रादुर्भाव कमी होत असतानाच मागच्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत, यासंदर्भातील माहिती मिळताच पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनासह संबंधित आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून डेंग्यूचा प्रसार वाढणार नाही यासाठी युद्धपातळीवर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
 पावसाळ्याच्या दिवसात ठीकठीकाणी पाणी थांबून डासाची उत्पत्ती होते, त्यातून मलेरिया डेंग्यूसारख्या आजाराची लागण होते, त्यामुळे ज्या गावात, प्रभागात डेंग्युचा संशयित रुग्ण आहे, तेथे आरोग्य कर्मचारी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत, आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करून, आवश्यक ती माहिती नागरिकांना देत आहेत. पाण्याचे साठे रिकामे करणे, ॲबेटचा वापर करणे, संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर. शेख सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी पाणी साठवू नये, गटारी नाल्यातून तुंबू नयेत याची काळजी घेण्यास ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका प्रशासनाला सुचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणांनी आजवर उत्तम काम केले आहे हे काम करीत असतांना या यंत्रणांनी सजग होऊन डेंग्यू व इतर साथरोग रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, स्थानिक स्वराज्य संस्थांनी यासाठी प्रबोधनाची मोहीम राबवावी, आरोग्य यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपायांबरोबरच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णावर वेळेत चांगले उपचार करावेत असे निर्देश पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
-------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या