*साई ते गव्हान रस्त्याचे काम ज्योतीराम चिवडे यांच्या धक्क्याने मार्गी लागले.*
लातुर : दि. २८ - तालुक्यातील मौजे साई ते गव्हान जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. तो रस्ता म्हणजे शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळचे विद्यमान आमदार तथा सद्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी हा रस्ता निवडून आल्यापासुन अवघ्या तीन महीन्यात पूर्ण करू असे अश्वासन दिले होते. पण निवडनुक झाली आणी आमदारही झाले, त्यानंतर मंत्री ही झाले पण या गोरगरीब जनतेच्या शेत रस्त्याचा मात्र मंत्री महोदयांना विसर पडला होता. अखेर छत्रपती संभाजीराजे मंडलाचे भाजप अध्यक्ष जोतीराम चिवडे यांनी वेळोवेळी या रस्त्याच्या प्रश्नासाठी लढा उभा केला होता. यासाठी साई येथील भाजपा कार्येकर्ते व शेतकऱ्यांने मोलाची साथ दिली. २०२० मध्ये तर चक्क चिवडे यांनी ह्या रस्त्याचे काम जर लवकरात लवकर नाही झाले तर पालकमंत्र्यांच्या घरावर भव्य मोठा मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर रस्त्याचे काम अखेर मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी व कार्येकर्त्यांनी ज्योतीराम चिवडे पाटील यांचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.