पोलीस भरती संदर्भात - राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी*

 *पोलीस भरती संदर्भात  - राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी*






अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद

  **महाराष्ट्र पोलीस दलात हजारो पदांची भरती केली जाणार असून, गृह विभागाकडून शासन आदेश जारी केला आहे 


 *पहा कसा आहे शासन निर्णय* 


 यानुसार पोलीस भरतीबाबतचा जुना शासन निर्णय गृह विभागाकडून रद्द करण्यात येत असून, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई - 


 तसेच राज्य राखीव पोलीस बल भरती प्रक्रिया - आता सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे.

 *या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असंही जीआरमध्ये म्हटलं आहे


*31 डिसेंबरपूर्वी होणार भरती* -  विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल - पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती होणार - असे काही दिवसापूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले 


*तसे पोलीस भरती बाबत* - आणखी काही अपडेट आले तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या