पूर परिस्थिती योग्य प्रकारे संचलन व परिचलन बाबत कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांनी घेतला आढावा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर पाटबंधारे विभाग क्र 1 चे कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांनी शुक्रवार, दि. 16 रोजी पूर परिस्थिती योग्य प्रकारे संचलन व परिचलन व्हावे या ऊद्देशाने निम्म्न तेरणा प्रकल्पांची पाहणी करुन तपासणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता जगताप यांनी पुर नियंत्रण यत्रंणाच्य संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व यंत्रणा सज्जते बाबत मार्गदर्शन करुन सुचना केल्या.
याप्रसंगी यांत्रिक विभागाचे उप अभियंता राऊत, स्थापत्य विभागाचे उप अभियंता नितीन बी. पाटील, शाखा अभियंता के. आर. येणगे, शेख चाँद व निलंगा उपविभागाचे उप अभियंता आर. के. पाटील हजर होते.
सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने पाटबंधारे विभागाच्या सर्वच यंत्रण सतर्क आहेत. याच अनुशंगाने लातूर पाटबंधारे विभाग क्र 1 चे कार्यकारी अभियंता रोहित जगताप यांनी पूर परिस्थिती योग्य प्रकारे संचलन व परिचलन व्हावे या ऊद्देशाने तेरणा प्रकल्प व तेरणा नदीवरील लातूर पध्दतीचे बंधारे याचे पुर परिस्थिति योग्य प्रकारे संचलन व परिचलन व्हावे या ऊद्देशाने हा पहाणी व तपासणी दौरा संयुक्तित करण्यात आला असुन, सर्व यंत्रणा सज्जते बाबत आढावा घेवून योग्या त्या सुचना केल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.