हेल्थ वर्कसना हिपॅटायटीस बी लसीची पहिली मात्रा
लातूर,दि.29(जिमाका):-जागतिक हिपॅटायटीस दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाकडील प्राप्त मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून जिल्हयातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेतील हेल्थ केअर वर्कस यांना हिपॅटायटीस बी लसीची पहिली मात्रा देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल.एस.देशमुख यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
जिल्हयातील सर्व नाकरिकामध्ये जनजागृती व्हावी याकरिता सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये कार्यक्रम आयोजित करून रूग्णालयात दाखल रूग्णांच्या नातेवाईक तसेच बाह्य रूग्ण विभागामध्ये आलेले रूग्ण त्यांचे नातेवाईकांना हिपॅटायटीस आजाराविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच हिपॅटायटीस हा आजार होऊ नये याकरिाता घ्यावयाची काळजी तसेच हिपॅटायटीस लस घेतल्यानंतर शरीरावर होणारे फायदे याबाबत देखील सर्वशासकीय आरोग्य संस्थेमध्ये माहिती देण्यात आली.
जिलहास्तरावर स्त्री रूग्णांलय,लातूर येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एल.एस.देशमुख यांच्या अघ्यक्षेतेखाली रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.राहुल वाघमारे यांनी जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंगभ करून स्त्री रूग्णांलय,लातूर येथील बाह्य रूग्ण विभागात आलेले रूग्ण त्यांचे नातेवाईक यांना हिपॅटायटीस आजाराविषयाी तसेच हिपॅटायटीस बी लसीबाबत माहिती देवून रूग्णांलयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.राहुल वाघमारे यांच्यासह रूग्णाालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांना हिपॅटायटीस लसीची मात्रा देण्यात आली
या कार्यक्रमास जिल्हा शलयचिकित्स डॉ.देशमुख,स्त्री रूग्णांलयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.राहुल वाघमारे,भिषक डॉ.धनंजय पडवळ, डॉ.अशोक धुमाळ तसेच रूग्णांलयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.