अंथरूणास खिळलेल्या व शारिरीक हालचाल न करता येणाऱ्या व्यक्तींना
कोव्हॅक्सीन लस दिली जाणार
लातूर,दि.29 (जिमाका):- अंथरूणास खिळलेल्या शारिरीक हालचाल करता न येणाऱ्या व्यक्तींना कोविड-19 प्रतिबंध लसीकरण केंद्रापर्यंत येवू शकत नसल्याने त्यांच्या लससीकरणासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य शासनाकडून अथंरूणास खिळलेल्या व शारिरीक हालचाल न करता येणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांच्या घरी जावून कोविड-19 प्रतिबंध लसीकरण करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अशा रूग्णंना फक्त कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे.
अशा नागरिाकांसाठी त्यांचे नियमित उपचार करणारे डॉक्टर/फिजिशियन यांचे सदरील व्यक्ती अंथरूणाला खिळून असल्याबाबतज व पुढील सहा महिने याच आवस्थेत राहण्याची शक्यता आहे.याप्रमाणे विहित वैद्यकिय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.तसेच संबंधित व्यक्ती अथवा त्यांची देखभाल करणाऱ्या घरातील व्यक्तीने/नातेवाईकाने कोविड-19 प्रतिबंध लस घेण्याची ईच्छा असल्याबाबात व हरकत नसल्याबाबत हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
उपरोक्तप्रमाणे वैद्यकिय प्रमाणपत्राची पूर्तता करून अथंरूणास खिळलेल्या व शारिरीक हालचाल करता न येणाऱ्या व कोविड-19 प्रबिंध लसीकरणासाठी इच्छूक नागरिाकांनी व्यक्तीचे/रूग्णांचे नाव,वय,पत्ता,संपर्क क्रमांक व पर्यायी संपर्क क्रमांक ,अंथरूनास खिळून असल्याचे कारण इत्यादी माहिती लातूर शहर महानगरपालिकेच्या mclatur.covid19vaccination@gmail.com या ई-मेल संकेतस्थळावर किंवा 91586 32333 या मोबाईल क्रमांकर संपर्क करून किंवा आरोग्य विभाग,मनपा कार्यालय,लातूर येथे संपर्क करून कळवावे जणेकरून अशा नागरिकांच्या लसीकरणाचे पुढील नियोजन करता येवू शकेल असे आवाहन लातूर शहर महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.