दिनांक:-29 जूलै 2021
मेडिकल ऑक्सिजन व्यवस्थापन व कार्यप्रणाली विषयक प्रशिक्षण संपन्न
...
लातूर,दि.29 (जिमाका):- कोविड -19 च्या तिस-या लाटेची संभावना लक्षात घेता तालुकास्तरावर ऑक्सिजन ची उपलब्धता आणि व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व अकरा ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व संबंधित कर्मचारी यांचे प्रशिक्षण कोविड (Covid-19 ) अंतर्गत सर्व नियमांचे पालन करून HEMR Unit उपसंचालक कार्यालय लातूर यांचे मार्फत नुकतेच जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,लातूर येथे घेण्यात आले.
या प्रशिक्षणाकरिता एकूण ७० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणाकरिता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,लातूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.विनायक शिरसाठ व डॉ.व्यंकटेश जोशी यांनीही मार्गदर्शन केले. व सर्व प्रशिक्षणार्थिना प्रत्यक्ष ऑक्सिजन प्लांटवर नेऊन प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आले. या प्रशिक्षणाकरिता जिल्हा शल्य चिकित्सक,डॉ.एल.एस.देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी,डॉ.सतीश हरिदास यांनी मार्गदर्शन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.