बल्लारपूर बसस्थानक परिसरातील वाहतूक ठरतेय डोकेदुखी : अनेक लहान मोठे अपघात घडतात

 

बल्लारपूर बसस्थानक परिसरातील वाहतूक ठरतेय डोकेदुखी : अनेक लहान मोठे अपघात घडतात

बल्लारपूर ( रिपोर्टर) : बल्लारपूर शहरातील मुख्यमार्ग म्हणजे चंद्रपूर-आल्लापल्ली राज्य महामार्ग या मार्गावर बल्लारपूर पेपरमिल, कवेलू कारखाने, शासकीय रुग्णालय, अनेक प्रशासकीय कार्यालये, रेल्वेस्थानक, वनविभागाचे कार्यालय, इतकेच नव्हे तर अनेक शाळा महाविद्यालय आहेत हल्ली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालय बंद असली तरी बल्लारपूर शहरातील वाहतूक ही जीवघेणी ठरतेय की काय असा प्रश्न निर्माण होत आहे विशेष बाब म्हणजे जुने बसस्थानक चौक, रेल्वे चौक, नगर परिषद चौक, नवीन बसस्थानक चौक, सुभाष टॉकीज चौक, पेपरमिल काटागेट परिसरातील चौक अपघातप्रवन चौक ठरतेय की काय असे चित्र निर्माण होत आहे विशेष बाब म्हणजे बल्लारपूर शहरात अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक दिवे(सिग्नल) असणे गरजेचे असतांना मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षा मुळे आहे तीच वाहतूक दिवे शोभेची वस्तू ठरले आहे वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने बल्लारपूर शहरातील नगर परिषद परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक दिवे लावण्यात आले होते मात्र ते देखभालीअभावी मागील कित्येक दिवसापासून बंद आहे सदर ठिकाण प्रशासकीय व आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असून शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय बल्लारपूर शहरातील नवीन बसस्थानक परिसरात अनेक लहान मोठे अपघात घडले आहे नेहमी या परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते अशा स्थितीत नवीन बसस्थानक समोरील रस्त्यावर ऑटोचालकांचे साम्राज्य आहे की काय वाटेल तिथे आपला ऑटो उभा करून वाहतुकीस अळथळा निर्माण करून वाद घालण्याची प्रकरण नित्याचीच झाली आहे इतकेच नव्हे तर अनेक वेळा बस ही स्थानकात प्रवेश करण्याच्या व बाहेर निघण्याच्या मार्गावरही ऑटो उभे असतात विशेष बाब म्हणजे आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या वाहतूक पोलिसांचेही न ऐकता अनेक ऑटोचालक आपले ऑटो उभे करतात.

       अशा स्थितीत बल्लारपूर येथील नवीन बसस्थानकसमोर बेशिस्त चालविणाऱ्या दोन ऑटोरिक्षानी एकमेकांना धडक देऊन आपले नुकसान करून घेतले सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही सदर घटना सोमवार दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली सुदैवाने ऑटोत बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली नाही मात्र या अपघातात दोन्ही ऑटोचे नुकसान झाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या