*स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कारवाई.07 गुन्हे उघडकीस :: 5 लाख 77000 रु चा मुद्देमाल जप्त.*

   *स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कारवाई.07 गुन्हे उघडकीस :: 5 लाख 77000 रु चा मुद्देमाल जप्त.*







     लातूर प्रतिनिधी         या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक  घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली होती.


               सदर मोहीम अंतर्गत पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.सदर पथक जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लातूर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या  दिवसा घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अट्टल घरफोड्या करणारा सुमित दगडू गरगेवाड आणि राम दगडू गरगेवाड राहणार मळवटी रोड लातूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी घरफोड्या केल्याचे कबुली दिली, त्यांच्याजवळून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल  सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण 4 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ।


सदर आरोपीकडून खालील गुन्हे उघडकीस आले

1) पोलीस ठाणे एमआयडीसी 

 cr no  349/ 2021 454,380


2) पोलीस ठाणे एमआयडीसी

    cr no 506/ 21 454,380 


3) पोलीस ठाणे एमआयडीसी

  cr no 283/ 2021  379


4) पोलीस ठाणे चाकूर

 cr no  364/21  454,380


         सदरची कार्यवाही ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस  अंमलदार अंगद  कोतवाड, राजाभाऊ मस्के, खुर्रम काजी, रवी गोंदकर ,यशपाल कांबळे, यांनी केली आहे


             तसेच आणखीन एका कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाने लातूर शहरातील राजीव गांधी चौकात सापळा लावला. माहितीप्रमाणे मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे 


 1) साहेबराव अंकुश जाधव, वय 24, वर्ष, राहणार- रमजानपुर ता. जि. लातूर ह. मु. लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर.

 यास पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली. असता त्याने त्याचे साथीदार यांच्या मदतीने.

 विविध ठिकाणाहून एकूण 04  मोटर सायकल चोरी केल्याचे सांगितल्यावरून सदरच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. सदर मोटार सायकलचे क्रमांक वरून माहिती घेतली असता सदरचे मोटरसायकल


1) पोलीस ठाणे शिवाजीनगर, गुन्हा रजिस्टर नंबर 233/2021, कलम 379 भा.द.वि.


2) विवेकानंद चौक, गुन्हा रजिस्टर नंबर. 553/2021,कलम 379 भा.द.वि.


3) विवेकानंद चौक, गुन्हा रजिस्टर नंबर 565/2021, कलम 379, भादवी प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले.

                  लातूर शहरातील वर नमूद पोलिस स्टेशन मधील गुन्हे उघडकीस आले असून नमूद गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल एकूण 04 मोटारसायकली किंमत अंदाजे 1,20,000/_  इतका किमतीचा मुद्देमाल नमूद आरोपी कडून जप्त करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.


              सदरची कामगिरीही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, पोलीस अंमलदार- योगेश गायकवाड, हरून लोहार , प्रमोद तरडे ,भीष्मानंद साखरे,अंमलदार लांडगे , पोलीस अमलदार अंगद कोतवाड, खुर्रम काजी ,राजेभाऊ म्हस्के, रवी गोंदकर, यशपाल कांबळे यांनी बजावली.


                गुन्ह्यांचा पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अमलदार करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या