*अखेर उदगीर येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी सोन्या उर्फ अमित नाटकरे यास कर्नाटक च्या जंगलातून 20-25 Km. पाठलाग करून अटक*


                  *अखेर उदगीर येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी सोन्या उर्फ अमित नाटकरे यास कर्नाटक च्या जंगलातून 20-25 Km. पाठलाग करून अटक*

लातूर प्रतिनिधी




                       दिनांक 29/07/2021 रोजी राञी 10.00 वा.चे दरम्यान रेल्वे स्टेशन रोड बस्वेश्वर चौकात सोन्या नाटकरे व जगदीश विजय किंवडे यांच्यात डोळे वटारून का बघतोस ? म्हणुन झालेल्या शाब्दीक बाचाबाचीतून सोन्या नाटकरे याने जगदीश किंवडे याच्या पोटावर धारधार शस्ञाने पोटावर वार केले होते. त्यात जगदीश गंभीर झाला होता. त्यास  सोन्या नाटकरे व तेथील काही लोकांनी सरकारी दवाखाना उदगीर येथे घेऊन गेले. तेथुन सोन्या नाटकरे हा फरार झाला.

                   त्या नंतर  जगदीश किंवडे यास पुढील उपचार  कामी वैदयकिय महाविदयाल, लातूर येथे घेवून जात असताना रस्त्यात जगदीश किंवडे याचा मृत्यु झाला.

                   यातील आरोपी सोन्या उर्फ अमित नाटकरे याचे शोध कामी मा.पोलीस अधिक्षक श्री. निखिल पिंगळे , अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डेनिअल बेन  यांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री गोरख दिवे यांच्या नेतृत्वाखाली खुनातील फरार आरोपी शोध कामी वेगवगळे 03 पथके तसेच  स्थागुशा येथील 02 विशेष पथक असे एकूण 05 पथके उदगीर येथे  पाठविण्यात आले होते.  

                   पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक करण्या करिता  पथकांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करत होते. सदर पथके आरोपीचे शोध कामी वेगवेगळया भागात रवाना केले.त्या दरम्यान दि.30/07/2021 रोजी आरोपी सोन्या नाटकरे हा मोघा रेल्वे पटरीच्या मार्गावर पायी फिरत असल्याची गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली.

              त्यावरून विशेष पथकांना त्या भागात पाठविण्यात आले. पथकांनी त्या ठिकाणी जावून  फरार आरोपी चा शोध घेतला असता तो रावणगाव येथून त्याचा नातेवाईक गणेश उत्तमराव झेले याला सोबत मो.सा.क्र.14 ए.ए.7205 या वर बसुन घेवुन सोन्या नाटकरे याचे बहिणेचे गाव मुडबी ता.बस्वकल्याण राज्य कर्नाटक येथे गेल्याचे गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली.

                  त्या वरून पथकांनी फरार आरोपीच्या बहिणीच्या गावी शोध घेतला असता तेथील गावकरी याच्या माहितीने अशा वर्णनाचे मुले हे बाजुच्या जंगलाच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली.लागलीच वरील पथके सदर जंगलात अहोराञ-दिवस जंगलातील 20 ते 25 कि.मी. अंतर पायी तुडवून त्या भागातील विविध शेतकरी,गुरे राखनारे,रस्त्याने पायी जाणारे यांच्या कडून माहिती घेऊन फरार आरोपी सोन्या उर्फ अमित नाटकरे व त्यास मदत करणारा गणेश झेले यास बस्वकल्याणच्या जंगलात 03 दिवसाच्या अथक कसोशीच्या प्रयत्ना नंतर अखेरकार खुनाच्या गुन्हयातील आरोपीस जेरबद करून पोलीस स्टेशन उदगीर शहर येथे आणले. 

                      सदर पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परिश्रम करून कर्नाटक मधील जंगलात 20 ते 25 किलोमीटर पायी सर्च पाठलाग करून नमूद आरोपीस अटक केली. यामुळे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी सर्व पथकाचे अभिनंदन व कौतुक करून त्यांना बक्षिस जाहिर केले आहे.

                     सदर पो.स्टे.गुरन 219/2021 क.302 भादवि दाखल गुन्हयातील आरोपी सोन्या उर्फ अमित नाटकरे यास मा.कोर्ट उदगीर यांचे समोर हजर केले असता आरोपीस पोलीस कोठडी दिली आहे. 

              गुन्हयाचा अधिक तपास उदगीर पोलिस स्टेशनचे पोउपनि व्हि.आय.ऐडके हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या