आत्मविश्वास माणसाला उभारी देतो.. डॉ. एजाज शेख
हज़रत मियां सय्यद खुंदमीर मेमोरियल कमेटी औसा तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार
औसा(अतन सुहेब कबीर/मुख़्तार मणियार ) विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात डोकावुन पहावे. व आपल्या आवडी नुसार आत्मविश्वास निर्माण करावे.चिकाटी आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले की क्षितिज पलीकडे भरारी घेतलीच समजा,असे प्रतिपादन औसा शहरातील नामवंत डॉ. एजाज सलीम शेख यांनी केले. ते हज़रत मियां सय्यद खुंदमीर मेमोरियल कमेटी औसा तर्फे महेदवी समाजातील एसएससी व एचएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी अब्दुल गनी करपूडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मकबूल बरोटे, कवी जिलानी मुल्ला सर, पत्रकार म.मुस्लिम कबीर, मैनिद्दिन मुल्ला आदी उपस्थित होते.
या वेळी 45 विद्यार्थाना शालेय साहित्य ,प्रमाणपत्र,व पुष्प गुच्छ देवुन सन्मान करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मकबूल बारोटे यांनी आपले अनुभव व्यक्त करून शिक्षणाचे महत्त्व व यूपीएससी एमपीएससी परीक्षा कडे आपले लक्ष देऊन प्रयत्न करावे.असे प्रतिपादन केले.पत्रकार म. मुस्लिम कबीर व कवी जीलानी मुल्ला सर यांनी ही मार्गदर्शन केले. प्रथम गौस पाशा मुल्ला दर्द यानी हम्द व नात शरीफ पेश केले.संघटक खुंदमीर मुल्ला यांनी या कार्यक्रमा ची रूपरेषा व उद्देश व्यक्त केले.अजीम आलुरे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी साठी खुंदमिर मुल्ला, नियामत लोहारे,नियामत अलुरे,अजिम अलुरे,आसीफ करपुडे,मुस्तफा अलुरे,साहिल सय्यद,खुंदमिर अलुरे, कामरान हावरे,अलताफ करपुडे,खुंदमिर हन्नुरे,फेरोज हन्नुरे ,आरेफ अलुरे,रहेमत हन्नुरे,तालेब हन्नुरे,गुड्डु हन्नुरे,शादाब हन्नुरे,सलिम मैंद,महुम्मद कुमारकीरी,रहेमत अलुरे,आशफाक मल्लेभारी, आदिनी परिश्रम घेतले.
















0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.