भारत वृक्षक्रांती मोहिमेअंतर्गत एक विद्यार्थी एक वृक्ष या उपक्रमाचे जिल्हास्तरीय उद्घाटन संपन्न

 भारत वृक्षक्रांती मोहिमेअंतर्गत एक विद्यार्थी एक वृक्ष या

उपक्रमाचे जिल्हास्तरीय उद्घाटन संपन्न








 

            लातूर,दि.27 (जिमाका) जि.प.प्रा.शा.अंकोली ता.जि. लातूर  येथे एक विद्यार्थी- एक वृक्ष या उपक्रमांतर्गत जिल्‍हास्‍तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्‍हयाचे शिक्षणाधिकारी प्राथमिक भगवान फुलारी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले यावेळी लातूर तालुक्‍याचे गट शिक्षणाधिकारी गिते डी.के. तसेच गावातील सरपंच व प्रतिष्‍ठीत नागरीक तसेच गंगापूर केंद्रांतर्गत मुख्‍याध्‍यापक व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

प्रारंभी शाळेतील प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांना मान्‍यवरांचे हस्‍ते एक-एक वृक्षवाटप करण्‍यात आले. जि.प.प्रा.शा.अंकोली येथील मुख्‍याध्‍यापक  व सह शिक्षक, ग्रामपंचायत अंकोली यांनी या कार्यक्रमाचे सर्व नियोजन केले. एक विद्यार्थी एक वृक्ष या मोहिमेचे प्रणेते  नाथन ए.एस. यांनी वृक्षलागवडीचे सखोल मार्गदर्शन केले.तसेच वृक्षांचे महत्‍व विविध उदाहरणा मधून सांगितले.

वन विभाग वृक्ष लागवड योजनेअंतर्गत जिल्‍हयातील विद्यार्थ्‍यांना  वृक्ष वाटप होणार आहे. विद्यार्थी यांनी प्राप्‍त वृक्ष ते स्‍वत: लावतील व त्‍याचे संवर्धन करतील. विद्यार्थी त्‍यांच्‍या घरी,शेतामध्‍ये उपलब्‍ध जागेनुसार वृक्ष लावू शकतात. असे ए.एस. नाथन यांनी मार्गदर्शनात सांगितले.  शेवटी केंद्रप्रमुख श्री तांबोळी  यांनी उपसिथतांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या