*उस्मानाबाद जिल्हाभरात पोलीसांचे कोम्बिंग ऑपरेशन*
दि. 27 - उस्मानाबाद -
उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात चोरी, दरोडा असे मालासंबंधी व इतर गुन्हे केलेले अनेक आरोपी व गुन्हेगार उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असुन यातील अनेक आरोपी हे उस्मानाबाद तसेच इतर जिल्हा, राज्यांस तपासकामी हवे असतांत. परंतु त्यांचा निश्चित ठावठिकाणा समजुन येत नसल्याने त्यांना पकडने जिकरीचे असते. अशा आरोपींसोबतच इतर संशयीत व्यक्तींचे इतीवृत्त (र्हिस्ट्रीशीट) पोलीस दलाने उघडलेले असुन या व्यक्तींचा सध्याचा व्यवसाय, वर्तनुक यावर पोलीस लक्ष देउन असल्याने वेळोवेळी त्यांना अचानक भेटून याची खात्री केली जाते.
या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनातून काल गुरुवार दि. 26 ऑगस्ट रोजी 23.00 ते आज दि. 27 ऑगस्ट रोजी 05.00 वा. दरम्यान जिल्हाभरात कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. अशा संशयीतांची यादी स्थानिक गुन्हे शाखे मार्फत संबंधीत पोलीस ठाण्यांत पाठवण्यात आली. या ऑपरेशनसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी- अंमलदारांना नेमण्यात येउन आपापल्या हद्दीतील आरोपींची 52 घरे- वस्त्या यांना अचानक भेटी देउन संबंधीत संशयीतांची खातरजमा करण्यात आली. हद्दीतील लॉजेस, 10 बसस्थानके व रेल्वे स्थानक, 45 ढाबे, 44 पेट्रोलियम विक्री केंद्रे, 34 बँका, 53 एटीएम केंद्रांस अचानक भेटी देउन तसेच महामार्गावरील संशयीत वाहनांची सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आली. या मोहिमे दरम्यान पोलीसांनी 30 हिस्ट्रीशीटर व्यक्तींना त्यांच्या निवासस्थानी भेट देउन त्यांच्या सध्याच्या वर्तनाची शहानिशा करण्यात आली. तसेच इतर जिल्ह्यांत गुन्हे करणाऱ्या 2 व्यक्तींविरुध्द संबंधीत जिल्ह्यास 2 ‘अ’ रोल तर इतर जिल्ह्यात गुन्हे करुन उस्मानाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या 2 व्यक्तींविरुध्द 2 ‘ब’ रोल संबंधीत पोलीस ठाण्यास पाठवण्यात आले आहेत.
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.