*आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत वाढवण्याच्या विषयी कोरोना नियमाच्या आधीन राहून बैठका घेण्याचे ठरले.
अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद दिनांक 26 / 8 / 2021 रोजी राष्ट्रवादी भवन मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील आणि उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार ना. छगन भुजबळ मा. ना. दिलीपरावजी वळसे पाटील मा. ना. नबाबभाई मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत फ्रंटल संघटनेच्या प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक झाली.
आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत वाढवण्याच्या विषयी कोरोना नियमाच्या आधीन राहून बैठका घेण्याचे ठरले.
या महत्वपूर्ण बैठकीत आपले सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख माननीय जयदेव गायकवाड यांनी सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय महामंडळावर काम करण्याची संधी लवकरात लवकर मिळावी अशी आग्रही मागणी केली.
आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका व जिल्हा परिषद , नगरपरिषद निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून लवकरच सामाजिक न्याय विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे *चिंतन शिबीर लोणावळा* या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.