मानव कल्याणाचे ध्यास घेतलेल्या जमियत उलमा-ए-हिंद पूरग्रस्तांसाठी धावून आली.

 मानव कल्याणाचे ध्यास घेतलेल्या जमियत उलमा-ए-हिंद पूरग्रस्तांसाठी धावून आली...





         सोलापूर ता.31-07-2021 स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नोंदविलेली जमियात उलमा -ए-हिंद ही देशव्यापी संघटना ज्या-ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती निर्माण होवून मानवांवर संकट येते त्या-त्या ठिकाणी मानवसेवेच्या दृष्टिकोनातून जमियत सर्वतोपरी मदत करण्यासाठीअग्रेसर असते. नुकत्याच सांगली,सातारा,कोल्हापूर तसेच कोकण भागामध्ये पुराने थैमान घातलेला होता.त्या ठिकाणी अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.अशा परिस्थितीत जमियत उलमा-ए-हिंद महाराष्ट्र या संघटनेच्या प्रत्येक जिल्हा शाखेकडून "एक हात मदतीचा"या उपक्रमात वस्तू रूपाने व आर्थिक स्वरूपात मदत गोळा करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून जमियत उलमा-ए-हिंद, सोलापूर शाखेतर्फे पूरग्रस्तांसाठी 1000 चादरी, साफसफाईचे सामान व इतर जीवनावश्यक साहित्य ट्रकमध्ये पाठवण्यात आले.

       यावेळी जमियत उलमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना इब्राहिम कासमी यांनी सांगितले की,इस्लाम धर्मामध्ये मानवसेवा उच्चस्थानी आहे. कुठलीही जात,धर्म,पंथ न पाहता मानवाची सेवा केली पाहिजे.या प्रसंगी जमियत उलमा-ए-हिंदचे जिल्हा सरचिटणीस हसीब नदाफ,हाजी अय्यूब मंगलगिरी, हाफिज अ. हमीद चांदा, हाजी अ.सत्तार दर्जी, मुस्ताक ईनामदार,युनूस डोणगावकर,अ.रशिद आळंदकर हाफिज महेमुद,युसूफ प्यारे ,सुलेमान आळंदकर,रफिकअण्णा ईनामदार,हसन हंजगीकर आदि उपस्थित होते.यावेळी हाफिज चांदा यांनी अल्लाहकडे सामुदायिक दुआ मागितली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या