तिसऱ्या लाटेची भीती; ४२१ शाळा आजही कुलूपबंदच

 *तिसऱ्या लाटेची भीती; ४२१ शाळा आजही कुलूपबंदच







दि. 1 - उस्मानाबाद -


*जिल्ह्यातील आठवी ते बरावी पर्यंतच्या शाळांची संख्या सुमारे ६४० एवढी आहे. तर विद्यार्थीसंख्या २० हजार १२५ च्या घरात आहे. परंतु, कोरोनाच्या भितीने आजही अनेक विद्यार्थी शाळेत येणे टाळू लागले आहेत. परिणामी ४२१ शाळा कुलूपबंद आहेत.*


*हे प्रमाण ३५ ते ४० टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. आजघडीला ८ हजार ९६४ विद्यार्थीच शाळेत जावून ज्ञानार्जन करीत आहेत.*


कोरोनाची पहिली लाट अद्याप ओसरलेली नाही. आजही एकेका दिवशी ७० ते १०० रुग्ण आढळून येत आहेत. असे असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळेच की काय, आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होऊनहीं। जिल्हाभरातील ६४० पैकी ४२१ शाळा कुलूपबंदच आहेत. आजघडीला केवळ २१९ शाळा सुरू असून ८ हजार ९६४ विद्यार्थी वर्गामध्ये बसून ज्ञानार्जन करीत आहेत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, पाठोपाठ दुसरी लाट येऊन धडकली. त्यामुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. दरम्यान, मध्यंतरी रुग्णसंख्या काहीअंशी ओसरल्यानंतर पुन्हा आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. एवढेच नाही तर वैद्यकीय तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा अंदाजही वर्तविला जात आहे. याच भितीमुळे अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवित नाहीत. त्यामुळे आजघडीला ६४० पैकी २१९ शाळाच सुरू आहेत.




*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012g@gmail. com

Web :www.laturreporter.in

 *उस्मानाबाद* रिपोर्टर *सय्यद महेबुब अली*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या