कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका!-वैद्यकीय तज्ज्ञ.*

 *कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका!-वैद्यकीय तज्ज्ञ.*






दि. 1 - उस्मानाबाद -


*पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी अशी लक्षणे बहुसंख्य रुग्णांमध्ये आढळून येतात. त्यामुळे ही लक्षणे दिसल्याने कोरोना झाला असे समजू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या.*


*आपल्या परिसरात व घरात सांडपाणी जमा होत असेल तर डेंग्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची भीती दूर ठेवून डेंग्यू होणार नाही, याची काळजी घ्यावी.*


*आतापर्यंत तालुक्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एकाही लहान मुलाला कोरोना आढळून आलेला नाही. मात्र, डेंग्यूवर उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.*


सर्वत्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असला तरी जुलै महिन्यापासून सर्दी-खोकला, डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना साधा ताप जरी आला तरी याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे.


सध्या गावागावांत सर्दी-खोकला, डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत असून, यात विशेषत: लहान मुलांची संख्या अधिक आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची लक्षणे कोणती असतील, याबाबत निश्चित माहिती नाही. डॉक्टरांच्या मते सर्दी-खोकल्याने रोज सुमारे ३० तर डेंग्यू- मलेरियाची लक्षणे घेऊन सुमारे ५ टक्के रुग्ण येत आहेत.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012g@gmail. com

Web :www.laturreporter.in

 *उस्मानाबाद* रिपोर्टर *सय्यद महेबुब अली*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या