ललित भवनाबाबत कामगार मंत्री सकारात्मक : आ. कैलास पाटील*

 *ललित भवनाबाबत कामगार मंत्री सकारात्मक : आ. कैलास पाटील*






दि. 1 - उस्मानाबाद -



कामगार कल्याण मंडळांतर्गत शहरातील इमारतीत सर्व सोयी-सुविधा असल्या, तरी सध्या या इमारतीला तडे गेले आहेत. त्यामुळे नव्याने इमारत बांधण्याची गरज आ. कैलास पाटील यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. यावर मुश्रीफ यांनी प्रस्ताव द्या, लवकरच त्याला मंजुरी मिळेल, असे आश्वासन दिल्याचे आ. कैलास पाटील यांनी सांगितले.


शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय आहे. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अनेक कामगारांसाठी व त्यांच्या मुलांसाठी यामध्ये उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, या इमारतीला तडे गेले असून, संपूर्ण हॉल, शिशुमंदिर,व्यायामशाळा, कार्यालय, संरक्षक भिंत यांना तडे गेल्याने याठिकाणी कामकाज करणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या खुल्या जागेमध्ये नवीन इमारत बांधण्यासाठी कल्याण आयुक्त यांना आदेश देण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने २९ जुलै रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली. यात कामगार कल्याण विभागाकडून नवीन इमारतीचा प्रस्ताव मागवून शासनाला पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच त्याला दोन टप्प्यांत मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले. या बैठकीला कामगार विभागाच्या सचिव विनिता सिंघल, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची उपस्थिती होती.



Web Blog👆

*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 *उस्मानाबाद* * प्रतिनिधी **महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या