कब्रस्तान संरक्षण भिंतीसाठी निधी द्या, मुस्लिम समाजाची आमदारांकडे मागणी

 *कब्रस्तान संरक्षण भिंतीसाठी निधी द्या, मुस्लिम समाजाची आमदारांकडे मागणी*




दि. 5 - उस्मानाबाद -


कसबे तडवळे येथील कब्रस्तान  संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार कैलास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


येथील कब्रस्तानाला संरक्षण भिंत नसल्यामुळे मोकाट जनावराचा वावर वाढत आहे. शिवाय, कब्रस्तानालगत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत भैरुला शाह कादरी यांचा दर्गाह असून, येथे येणाऱ्या भाविकांनादेखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. मुस्लिम समाज, हजरत भैरुल्लाह शाह कादरी तेलफेअर कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी आ. कैलास पाटील यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.


निवेदनावर राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मुशरफ मुजावर, जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जमाले कमिटीचे सचिव अलताब मुजावर, हारून कोतवाल, शकिल कोतवाल, हासन कोरबू, अजीम कोतवाल, सुबान शेख, जयशील भालेराव, इम्तियाज कोरबू आदींच्या सह्या आहेत. यावेळी चंद्रप्रकाश जमाले, माजी उपसरपंच तुळशीदास जमाले, जयभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जमाले, शिवसेना तालुका प्रमुख सतीश सोमाणी, किशोर डाळे, ग्रामपंचायत सदस्य विशाल जमाले, हसन शेख, अलताब मुजावर, हारून कोतवाल आदी उपस्थित होते.



Web Blog👆

*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद रिपोर्टर महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या