गालीब नगर , सुलतानपुरा , मिल्ली कॉलनीमध्ये रस्ते व नाली करा, शिवसेना शहर उपप्रमुख प्रशांत साळुंकेे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी*

 *गालीब नगर , सुलतानपुरा , मिल्ली कॉलनीमध्ये रस्ते व नाली करा, शिवसेना शहर उपप्रमुख प्रशांत साळुंकेे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी*






दि. - 5 - उस्मानाबाद -


उस्मानाबाद शहरातील गालीब नगर , सुलतानपुरा , मिल्ली कॉलनी या भागामध्ये आजतागायत रस्ते व नाली वक्फ बोर्डची जागा असल्या कारणाने रस्ते व नाल्या केल्या नाहीत . या भागातील नागरीकांकडून नगर परिषद , उस्मानाबाद हे घरपट्टी . नळपट्टी  इतर टॅक्स वसुल करीत असून वरील सुख सुविधा , रस्ते नाल्याअभावी सदर भागात  पावसाचे पाणी व नाल्यांचे घाण पाण्याचे निचरा न झाल्याने तसेच नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असणाऱ्या जागेवर अतिक्रमण झाल्याने सदर पाणी साचून राहत आहे . त्यामुळे येथील नागरीकांध्या लहान मुलांच्या आजारात व साथीच्या रोगात वाढ होत आहे .


याच भागात अभिनव इंग्लीश स्कूल व या भागातील दुसरी शाळा आहेत.  मात्र वक्फ बोर्ड नाहरकत नसताना खासदार निधीतून मात्र पक्के सिमेंट रोड होतात . मग गरीब  सामान्य झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरीकांना टॅक्स भरून सुध्दा रोड व नाल्याची सुविधा उपलब्ध का होत नाही ? याचा खुलासा जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांनी तसेच वक्फ बोर्ड कार्यालय , औरंगाबाद यांनी द्यावा , अशी मागणी उस्मानाबाद शिवसेना शहर प्रमुख प्रशांत साळुंके यांनी केली आहे.



Web Blog👆

*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद रिपोर्टर महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या