*बस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय*
दि. 5 - उस्मानाबाद -
तालुक्यातील पारगाव येथे सकाळी ८.३० वाजता पोहचणारी कळंब- पारगाव-चौसाळा-कळंब ही बस लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आली. यानंतर एसटी महामंडळाने विविध मार्गावरील बसगाड्या सुरू केल्या असल्या तरी ही बस अजूनही बंदच आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पारगाव हे उस्मानाबाद बीड जिल्ह्याच्या सीमेवरील गाव आहे. या ठिकाणी कळंब आगराची कळंब पारगाव-हातोला- कळंब ही बससेवा मागील दहा वर्षांपासून सुरू होती. मात्र, मध्यंतरी प्रवासी मिळत नसल्याचे कारण देत ती बंद करण्यात आली होती. नंतरच्या काळात लाखनागाव, शेंडी, पिंपळगाव (क), रुई, लोणखस, पारगाव, हातोला येथील नागरिकांच्या मागणीनुसार कळंब आगराने कळंब पारगाव हातोला-कळंब या बस ऐवजी कळंब- पारगाव चौसाळा-कळंब ही बस सुरू केली. त्यामुळे कळंबला जाणाऱ्यांची व कळंबवरून पारगाव, चौसाळाकडे येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली होती. या बस सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगला होता.
दरम्यान, कोरोना लोकडाऊनमध्ये ही बससेवा पुन्हा बंद केली, ती आजतागायत सुरू केली नाही. त्यामुळे वरील गावातील प्रवाशांना कळंबला. जाण्यासाठी खाजगी वाहन करून जावे लागते किंवा वाशी किंवा पारा येथे जाऊन तेथून बसद्वारे प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा वाया जात असून, यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे बंद असलेली बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
Web Blog👆
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद रिपोर्टर महेबुब सय्यद*


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.