आ.अभिमन्यू पवार यांची अधिकाऱ्यांसह सरपंचाची ऑनलाईन बैठक संपन्न.

आ.अभिमन्यू पवार यांची अधिकाऱ्यांसह सरपंचाची ऑनलाईन बैठक संपन्न.





 औसा प्रतिनिधी औशाचे  आ. अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील औसा व निलंगा तालुक्यातील गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व विविध विभागांचे अधिकारी यांची आॅनलाईन बैठक घेतली स्वतंत्र दिनापासून त्रैवार्षिक ग्रामविकास कृषी आराखडे, ग्रामनिधी तयार करण्यास सुरुवात होणार असून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व गावाचा विकास साधण्यासाठी सुक्ष्म नियोजनासह आराखडे तयार होणे आवश्यक असल्याने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 मनरेगातून ग्रामसमृद्धीचे उद्दिष्ट ठेवून मे आणि जून महिन्यात मतदारसंघातील सर्व गावांमध्ये आ.अभिमन्यू पवार यांनी दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता.ग्रामविकास कसा असावा हे पाहण्यासाठी येणाऱ्या काळात देशभरातून नागरिक औसा मतदारसंघात यावेत असा मतदारसंघ घडविण्याचे ध्येय असून त्यासाठी मी राजकारण बाजूला ठेऊन काम करत आहे, आपणही राजकारण बाजूला ठेऊन प्रत्येक शेतकऱ्याला लाभ कसा देता येईल याचे नियोजन करावे असे आवाहन आ. अभिमन्यू पवार यांनी उपस्थित सरपंचांना केले. यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले की औसा मतदारसंघातील हरित क्षेत्र ०.१ टक्के इतके अल्प असून ते वाढवण्यासाठी शंभर टक्के बांधावर, मोकळ्या जागेवर बिहार पॅटर्न, मनरेगा अंतर्गत वृक्षलागवड करण्याचे नियोजन करावे, पाठपुरावा करून मनरेगाअंतर्गतच्या सर्व २६२ कामांचा अभिसरण आराखड्यात समावेश करून घेतला असून ग्रामविकास आराखड्यात अभिसरणाचा पुरेपूर वापर करावा, गोठा, शेततळे, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प लाभ  शेतकऱ्यांच्या नावासहित आराखडे तयार करावे, दलित वस्ती, तांडा वस्ती, आवास योजनेची कामे प्रस्तावित करावीत, सर्व शिव, शेत व पाणंद रस्ते प्रस्तावित करावेत, जॉब कार्ड्स ची फोड करून जॉब कार्ड्स धारकांची संख्या वाढवावी, २७ वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी लाखो कोटी रुपयांचे बजेट असून त्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या नावांसह वैयक्तिक लाभाची कामे आराखड्यात समाविष्ट करावीत, २५ केव्हीए चे ट्रान्सफॉर्मर ६३ केव्हीए चे तसेच ६३ केव्हीए चे ट्रान्सफॉर्मर १०० केव्हीए चे करायचे असून त्यासाठी आराखड्यात मागणी करावी, खचलेल्या, बुजलेल्या विहिरींचे दुरुस्ती, खोलीकरण, रिंग बांधकामाची कामे कृती आराखड्यात प्रस्तावित करावेत तसेच सरळ रेषेमध्ये घनवन लागवड करण्यासाठी प्रस्ताव समाविष्ट करावेत अशा सूचना या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या.

अभिसरणासाठी सरपंचांची कार्यशाळा आयोजित करण्यासही सांगितले आहे. या बैठकीला औशाचे गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, निलंगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, उपविभागीय अभियंता जयंतराव जाधव, विस्तार अधिकारी, मतदारसंघातील सर्व सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या