देवानंद रोचकरी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून मंत्रालयातुन उस्मानाबाद पोलिसांनी केली अटक

 आरोपी देवानंद रोचकरी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून मंत्रालयातुन उस्मानाबाद पोलिसांनी केली अटक




प्रतिनिधी/उस्मानाबाद अल्ताफ शेख,


8 दिवसांपासून फरार असलेल्या मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणी एक्स आरोपी देवानंद रोचकरी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून गेल्या 8 दिवसांपासून फरार असलेल्या रोचकरी याना मुंबई मंत्रालय येथून अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद पोलिसांच्या विशेष पथकाने रातोरात मुंबई येथे जाऊन रोचकरी यांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी अटकेची माहिती दिली आहे. रोचकरी यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे नोंद असून त्यात सावकारकी , शासकीय जमीन हडप करणे , मारहाण , जीवे मारण्याचा प्रयत्न करणे याचा समावेश आहे रोचकरी याच्यावर यापूर्वी 2 वेळेस हद्दपारची कारवाई करण्यात आली होती. उस्मानाबाद पोलीस दलाने अखेर तुळजापूर येथील मोठ्या भूमाफियास अटक केली आहे त्यामुुुळे उस्मानाबाद पोलिसांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या