जावेद पटेल यांना समाजरत्न पत्रकार पुरस्कार से सम्मानित
औसा प्रतिनिधी
कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस लेखणीच्या माध्यमातून क्षणाचाही खंड न पडता अविरतपणे समाजासाठी वाहून घेणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा एक छोटासा गौरव व्हावा. या उद्देशाने राजमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत हेच जीवनदान ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने हा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे .म्हणून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या चौथ्या आधारस्तंभाने कोरोना काळात अथांगपणे आपली लेखणी झिजवली त्याचबरोबर समाजा मधील अन्याय अत्याचार यावर प्रकर्षाने प्रकाश टाकत शासनाला आणि प्रशासनाला जागे करण्याचे काम केलं.अशाप्रकारे पत्रकारिता क्षेत्रातील काम करण्या-या दैनिक देवदर्शन चे संपादक जावेद पटेल यांना संस्थे मार्फत हा समाज रत्न पत्रकार पुरस्कार 2021 देऊन गौरविण्यात आले.या समाज रत्न पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवारामध्ये अभिनंदन होत आहे.




0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.