औसा,देवणी व लातूर तालुक्यात फिरते पशुवैद्यकीय पथक सुरु

 औसा,देवणी व लातूर तालुक्यात

फिरते पशुवैद्यकीय पथक सुरु









लातूर,दि.18(जिमाका):- मा.मुख्यमंत्री पशुस्वाथ्य योजने अंतर्गत औसा, देवणी व लातूर येथे फिरत्या पशुवैद्यकिय सेवा पुरविण्याच्या हेतूने वाहने उपलब्ध्‍ करुन देण्‍यात आली आहेत. या फिरते पशुवैद्यकीय पथका मार्फत जनावरांना कृत्रिम रेतन, गर्भधारणा तपासणी, लसीकरण, शस्त्रक्रिया अशा सुविधा देण्यात येत आहेत.

सदर योजना बळकट करण्याच्या हेतूने व एका फोन क्रमांकावर चिकित्सा सुविधा उपलब्ध्‍ होण्यासाठी 1962 या क्रमांकाचे कॉल सेंटर पशुसंवर्धन विभागाकडून दिनांक 18 मे 2021 रोजी कार्यान्वीत करण्यात आले आहे.कॉल सेंटर हे सकाळी 8 ते दुपारी 3.30 पर्यंत कार्यरत असते. सदर सुविधा औसा,देवणी व लातूर या तीन तालुक्यात प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त  डॉ.नानासाहेब कदम यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या