*औसा तालुक्यात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा*
औसा प्रतिनिधी:-
स्त्री ही जगतजननी असल्यामुळे ती सर्वावरर्ती निर्व्याज प्रेम करते. भाऊ बहिणीचे आदर्श नाते दर्शविणारा हा पवित्र दिवस रक्षा बंधन आपण साजरा करत असतो.
औसा तालुक्यातील लामजना तपसेचिंचोली, जावळी , बेलकुंड, उजनी ,नागरसोगा आदी ग्रामीण भागातील बहिणीने नववस्त्र धारण करून पाटाभोवती सुबक रांगोळी काढून पाटावर भाऊरायास बसवून भावाच्या हातात राखी बांधून भावाच्या रक्षणासाठी व दीर्घायुष्य साठी देवाला श्लोक रुपात प्रार्थना केली. ओम एनबंधु बळीराजाहा,दानवेनद्रो महाबलाहा, तेंनत्व प्रतिब्धन्हा रक्षेमाचलमहाचल.....
भाऊ बहिणी मधील आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य अजूनही टिकून असल्याचे रक्षा बंधन च्या माध्यमातून दिसून आले.भाऊ बहिणी च्या अतूट प्रेमाचे नाते अधिक दृढ करण्याचा रक्षा बंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.