कौशल्य विकासासाठी 6 हजार कोटींची तरतूद हवी
-डॉ किरण झरकर
लातूर/प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दरवर्षी सहा हजार कोटी निधीची तरतूद हवी असे मत आपल्या 'स्किल बुक' पुस्तकाच्या माध्यमातून एक कोटी तरुणांना एक लाख कौशल्याच्या शृंखलेत जोडणारे, देशातील आयटीआय क्षेत्रातील पहिलीवाहिली मानद डॉक्टरेट पदवी संपादन करणारे तंत्रस्नेही डॉ. किरण झरकर यांनी येथे व्यक्त केले.
येथील सामाजिक व सांस्कृतिक विचारपीठ माध्यम आणि दगडे परिवाराच्या वतीने आयोजित सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. वाशी (उस्मानाबाद) येथे शासकीय आयटीआय मध्ये शिल्प निर्देशक म्हणून काम करीत असून त्यांचे व्होकेशनल ट्रेनिंग पॉलिसी हे रिसर्च आर्टिकल वाचून माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी कौतुक केले होतेे. या आर्टिकलवर महाराष्ट्र विधानसभेत चर्चा झाली होती. पंधराहून अधिक ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर असून तीन आंतरराष्ट्रीय रिसर्च आर्टिकल प्रकाशित झाले आहेत. देश-विदेशातून या आर्टिकल ला पंधरा पुरस्कार मिळाले आहेत.
जगन्नाथपुरीचे शंकराचार्य, नामवंत संतमहंत व मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्ली येथे 9 डिसेंबर रोजी त्यांच्या 'स्किल बुक' प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात जगभरातील सुमारे शंभर कोटी विद्यार्थ्यांना एक लाख कौशल्याशी जोडले जाईल असेही डॉ किरण झरकर म्हणाले.
दुर्दैवाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून आयटीआय क्षेत्र जरासे दुर्लक्षितच राहिले अशी खंतही त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली. केंद्र सरकारकडून एक रुपयाही अनुदान न घेता आपण हा प्रकल्प राबविणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी माध्यम चे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश दगडे, डॉ. हंसराज बाहेती, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवारी, राज्य इतिहास परिषदेचे अध्यक्ष डाॅ. सोमनाथ रोडे, महाराष्ट्र मुख्याध्यापक फेडरेशनचे अध्यक्ष वसंतराव पाटील, रामानुज रांदड प्रा. स्मिता दगडे, संपादक चंद्रकांत झेरिकुंठे, पीटीआय चे प्रतिनिधी प्रा. विनोद चव्हाण, प्रतीक दगडे आदींची उपस्थिती होती.
फोटो
सामाजिक व सांस्कृतिक विचारपीठ माध्यम आणि दगडे परिवाराच्या वतीने डॉ किरण झरकर यांचा सत्कार करताना माध्यम चे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश दगडे, डॉ. हंसराज बाहेती, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष जुगलकिशोर तिवारी, राज्य इतिहास परिषदेचे अध्यक्ष डाॅ. सोमनाथ रोडे, महाराष्ट्र मुख्याध्यापक फेडरेशनचे अध्यक्ष वसंतराव पाटील, रामानुज रांदड प्रा. स्मिता दगडे, संपादक चंद्रकांत झेरिकुंठे, पीटीआय चे प्रतिनिधी प्रा. विनोद चव्हाण, प्रतीक दगडे आदी.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.