विलासराव देशमुख वैदकीय महाविद्यालय लातूर येथे आदर्श मैत्री फाउंडेशन च्या वतीने रक्षाबंधन सण साजरा
लातूर - येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना काळातही रुग्ण सेवा देत आपले कर्तव्य बजावणाऱ्या सिस्टर सोबत
आदर्श मैत्री फाउंडेशनच्या सर्व संचालकांना सिस्टर कडून राखी बांधून त्यांना स्नेह भेट देऊन रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता सुधीर देशमुख तर प्रमुख उपस्थित डॉ.संतोष डोपे,रूग्णालय अधीक्षक,तसेच अधिसेवीका अमृता पोहरे,आदर्श मैत्री फाउंडेशचे अध्यक्ष संतोष बिराजदार ,संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर, तुकाराम पाटील, रमेश बिराजदार,निलेश राजमाने,अड. दासराव शिरूरे,डि एस.पाटील,सुंदर पाटील कव्हेकर,कल्याण बदने,अशोक तोगरे,अरविंद औरादे,
चंद्रशेखर गिरी,संतोष बालगीर,अमोल जाणते, तेजेश शेरखाने,राजेश मित्तल,तानाजी पवार,आदिना उपस्थितीत सिस्टर च्या हस्ते राखी बांधून त्यांना स्नेह भेट देऊन रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला .
आज रक्षाबंधन प्रत्येकजण हा सन आपआपल्या कुटुंबात आपल्या भावा समवेत साजरा करत असताना या रुग्णालयातील सिस्टर आपला परिवार सोडून आपले कर्तव्य बजावत आहेत. तसे पाहता गेली दिड वर्षांपासून करोना काळात स्वतःच्या जीवाची, परिवाराची पर्वा न करता करोना रुग्णाची स्वतःच्या भावा प्रमाणे,आपल्या कुटुंबातील सदस्यां प्रमाणे सेवा केली.या सेवा बाजवणाऱ्या परिचारकांना ''सिस्टर''का संबोधले जाते याचा प्रत्येय या काळात सर्वांनाच
आला.आशा या भगिनी कडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन हा सण सामाजिक बांधीलकी जोपासत साजरा करत असल्याचे मत फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कर्तव्याची जाणीव ठेवून आंनदाने मन लावून काम केल्यास स्वतःलाही समाधान मिळते व समाज हि नोंद घेत असतो
त्याचेच उत्तम उदहारण आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने आज आमच्या सिस्टरच्या हस्ते राखी बांधून घेवुन त्यांना दिलेला सन्माण होय.लातूर शहरातच् नव्हे तर म्हाराष्ट्रात प्रथमच आदर्श मैत्री फौंडेशन ने असा उपक्रम राबवाला असेल् मत लातूर येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता सुधीर देशमुख यांनी व्यक्त करत आदर्श मैत्रीच्या आदर्श कार्याचे व सर्व संचालकांचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक
शिवराजजी मोटेगावकर यानी केले तुकाराम पाटील, डॉ.संतोष डोपे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन अशोक तोगरे यांनी केले व आभार अमृता पोहरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रवीण सूर्यवंशी, कल्पना फरकांडे, मदन भगत, मयूर कदम. आदि परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.