*महिला सरपंचाच्या पतीला ग्रामपंचायतीत 'नो एन्ट्री’, सरकारचे निघाले फर्मान: कामकाजात हस्तक्षेप आढळून आल्यास होणार कारवाई*
दि. 4 - उस्मानाबाद -
*सरपंचपद महिलेकडे असल्यानंतर कारभारही महिलांनीच हाकला पाहिजे. यात पतीचा हस्तेक्षेप होता कामा नेय. पतीला जर ग्रामपंचायत कारभारचा अनुभव असेल तर पतीने पत्नीला अनुभव शेर करुन कामकाज करून घेतले पाहिजे.*
*-सुरेखा गोरे, सरपंच, ग्रामपंचायत, बेडकाळ*
*पत्नी सरपंच असताना तिच्या कारभारात पतीचा हस्तक्षेप योग्य नाही. दरम्यान, जर पती प्रशासकीय कामकाजात अनुभवी असतील तर त्यांचा गावच्या विकासासाठी घरीच सल्ला घेणे चांगले राहील, असे मला वाटते. सरपंच पत्नीच्या खुर्चीवर बसून सह्या करणे हे मात्र चुकीचे आहे.*
*- प्रा. राजश्री वरपे, सरपंच, मस्सा खं*
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. परंतु, अनेक ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच नामधारीच असून त्यांचे पती तसेच नातेवाईक कामकाजात हस्तक्षेप करतात. ही बाब आता शासनाने गांभीर्याने घेतली आहे. अशा प्रकरणात आता थेट कारवाई होणार आहे. जिल्ह्यात ६२२ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ५० टक्के म्हणजे, जवळपास ३२२ महिला सरपंच आहेत. यापैकी काही महिला सक्षमपणे ग्रामपंचायतीचा गाडा हाकत आहेत.
मात्र, काही ग्रामपंचायतींत सरपंचपदाची खुर्ची जरी महिलेकडे असली तरी प्रत्यक्ष कामकाज पती वा नातेवाईकच पाहतात. या अनुषंगाने सातत्याने तक्रारीही होत होत्या. दरम्यान, हा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने आता अशा प्रकरणांमध्ये थेट कारवाईचा निर्णय घेतला आहे..
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* रिपोर्टर *सय्यद महेबुब अली*

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.