*कोरोना, लॉकडाऊन गेले उडत, लाचेला लाज कसली?*
दि. 4 - उस्मानाबाद
*लाचखोरीत आता कोणीही मागे राहिले नाही. अगदी ज्ञानदानाच्या पवित्र समजल्या जाणा-या क्षेत्रातही लाचखोरी झाली. यावर्षी लोहारा व उस्मानाबाद तालुक्यात दोन मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले.*
*दोन कोतवालही यंदा जेलवारी करुन आले आहेत. गावपातळीवरील कामांसाठी सरपंच, ग्रामसेवकही लाच घेताना अडकले. हेच नव्हे तर उच्चपदस्थ अधिकारी अभियंतेही यात मागे राहिले नाहीत.*
*फेर नकलेसाठी १०० रुपये..*
*आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कोतवालाने तक्रारदारास त्याच्या आजोबाच्या जमिनीच्या फेरची नक्कल शोधून देण्यासाठी केवळ १०० रुपये लाच स्विकारली होती.*
*वाळूसाठी लाखाचा हप्ता....*
*भूमच्या उपविभागीय अधिकार्यानी अवैध वाळू वाहतूक सुरळीत चालू देण्यासाठी सुमारे १ लाख १० हजार रुपयांची लाच मागून त्यात हजारांची तडजोड केली होती.*
कोरोनाचा कहर सुरु असताना, लॉकडाऊन लागलेले असताना, वर्दळ कमी झालेली असतानाही लाचेचे अस्तित्व काही कमी व्हायला तयार नाही. चालू वर्षात आजतागायत १९ लाचखोरीची प्रकरणे समोर आली आहेत. विशेष म्हणजे, गतवर्षी याच कालावधीत केवळ ६ प्रकरणे उघड झाली होती.
गतवर्षी आरोग्य वगळता इतर विभागांचा निधी कमी झाला होता. परिणामी, लाचेची प्रकरणे कमी दिसून आली. मात्र, आता निधी येतोय तशी लाचखोरीही वाढल्याचे दिसून येत आहे. लाचलुचपत विभागाच्या औरंगाबाद परिक्षेत्रात उस्मानाबादसह बीड, जालना व औरंगाबाद या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. चालू वर्षात सर्वाधिक प्रकरणे औरंगाबाद जिल्ह्यात ३८ इतकी उघड झाली. उस्मानाबादने जालन्याच्या बरोबरीने १९ प्रकरणे समोर आणली. बीडमध्ये १५ कारवाया झाल्या आहेत.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* रिपोर्टर *सय्यद महेबुब अली*

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.