संरक्षक भिंती विना असलेल्या ईदगाहात घाणीचे साम्राज्य,
पावित्र्य जपण्यात ग्रामपंचायत अपयशी.
शेख बी जी.
औसा.दि.३ तालुक्यातील भादा येथे अवैध धंद्यांना ऊत आला आहे. गावातील ईदगाह मैदान या ठिकाणी अनेक जण रमी, तिरट या सारखे डाव खेळणे, तसेच घरातील कचरा संबंधित जागेवर आणून टाकणे ,यामुळे येथे घाणीचे साम्राज्य वाढले आहे.
सुरुवातीला या ठिकाणी वास्तव्य कमी असल्याने स्वच्छता होती. मात्र भूकंपानंतर गावाचे विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यने लोकांचे वास्तव्य ,रहदारी वाढली. त्यामुळे रोडच्या बाजूला असलेल्या या पवित्र ठिकाणी येथील काही मंडळी शौच्यास बसून घाण करत आहेत.
ही समस्या लक्षात घेऊन यापुर्वी या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांनी तारेचे कंपाउंड घेण्याचे ठरवले .त्यावेळेला काही लोकांनी हे काम थांबविले. त्यानंतर तर या ठिकाणी अवैध धंदे चालू झाले. मटका,जुगार यासारखे खेळ या ठिकाणी होऊ लागले. रोडच्या कडेला असल्यामुळे जवळ असलेल्या अनेकांनी त्या ठिकाणी कचरा टाकून उकिरडे तयार केले.बऱ्याच वेळेला या ठिकाणी मृत जनावरे टाकली जातात. त्यामुळे दुर्गंधी येते.वर्षातून दोन वेळेला या ठिकाणी जाताना त्रास होतो.
ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीवर अनेकांनी कब्जे केले आहेत.या वाढलेल्या वस्तीमुळे याठिकाणी घाण वाढत आहे.
या होणाऱ्या घाणीकडे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. म्हणून या ठिकाणी संरक्षण भिंत घेतल्यास ही घाण होण्यापासून वाचवता येऊ शकते. अशा प्रकारची घाण होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने संरक्षक भिंत बांधून द्यावी अशी मागणी स्थानिक मुस्लिम समाजाकडून होत आहे.
यासंदर्भात येथील फारुक पठाण यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की "जुगार या ठिकाणी सर्रास खेळला जातो याठिकांणचे लोक ईदगाह जवळच शौच्यास बसतात.उकिरडे याच जागेवर बनवले आहेत. तेव्हा प्रशासनाने आम्हाला संरक्षण भिंत बांधून द्यावी."



0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.