आझाद कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के
औसाप्रतिनिधि औसा येथील हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या आझाद कनिष्ठ महाविद्यालयाचा एच एस सी परीक्षा 2021 मध्ये निकाल शंभर टक्के लागला असून 38 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर 02 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कु. पटेल तनविर रियाज 92.83% गुण घेऊन प्रथम, सावंत महेश धनराज 90.83% गुण घेऊन द्वितीय तर लुंगसे वैष्णवी गोविंद 90.5% गुण घेऊन तृतीय आले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष संजय कुलकर्णी, सचिव तथा नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, प्राचार्य डॉ ई. यू. मासुमदार, उपप्राचार्य टी.ए. जहागीरदार , प्रा शेख एजाज.एफ., प्रा पटेल के.एच., प्रा पाटील आय.एन.,
प्रा गोरे आर.व्ही. सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.