क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नावात बदल, आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार… -
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद
क्रीडा क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नावात बदल करण्यात आला असून, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा ऐवजी आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नामकरण करण्यात आले आहे. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले मेजर ध्यानचंद यांनी भारताला जगात एक वेगळी ओळख दिली आणि आता भारत सरकारने त्यांच्या नावाने सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशवासियांना ही माहिती दिली. त्याच्या ट्विटर हँडलवरून एका पोस्टमध्ये लिहिले होते की, मेजर ध्यानचंद हे भारतातील महान खेळाडूंपैकी एक आहेत आणि त्यांच्या नावावर खेळाच्या सर्वात मोठ्या पुरस्काराचे नाव देणे योग्य ठरेल. हा मोठा संदेश हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवर जारी करण्यात आला आहे. मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगभरात प्रसिद्ध केले. ऑलिम्पिकमध्ये भारताला अनेक सुवर्णपदके जिंकून देणाऱ्या या खेळाडूची हॉकी स्टिक मॅग्नेटची मानली जात होती.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.