अहमदनगर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
लातूर,दि.3 (जिमाका):- पुणे येथील मुख्यालच्या वतीने दिनांक 7 ते 23 सप्टेंबर 2021 या कालावधीत अहमदनगर,बीड, लातूर ,उस्मानाबाद ,पुणे व सोलापूर या सहा जिल्ह्यातील नवयुवकांसाठी सेन्य भरती मेळावा राहुरी जि.अहमदनगर येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.
तरी याकरिता पात्र उमेदवारांनी या www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी दि.22 ऑगष्ट 2021 पर्यंत करावी..सोल्जर जनरल ड्युटी,सोल्जर ट्रेडसमॅन,सोल्जर टेक्निकल,सोल्जर टेक्निकल (अविशन),सोल्जर नर्सिग असिटंट यासाठी भरती घेतली जाणार आहे.
लातूर जिल्हयातील पात्र उमेदवारांनी नमुद केलेल्या संकेतस्थाळवर ऑनलाईन नोंदणी करून सदरील सैन्य भरती मेळाव्यात सहभाग नोंदवूण जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन निवाीस उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी केले आहे.
वृत्त क्र.701
सोयाबीनपिकारील चक्री भुंगा किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन
लातूर,दि.4 (जिमाका):- जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळुन आलेला होता. यावर्षी सुद्धा या कीडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चक्री भुंगा ही कीड पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते यामुळे झाडाचा वरील अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वालुन जातो, तर अली देठ, फांदी आणि खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते त्यामुळे पुर्ण झाड वाळुन जाते व वेळेवर उपाय योजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. या पार्श्र्वभुमीवर सोयाबीनवरील चक्री भुग्याचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास शेतकऱ्यांनी पुढील उपाय योजना करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,यांनी केले आहे.
पेरणी जुलैच्या दुस-या आठवड्याच्या आत पुर्ण करावी. पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण शिफारसीप्रमाणे वापरावे. दाट पेरणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो. जेथे चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट 10 टक्के दाणेदार 10 किलो प्रति हे. जमिनीत ओल असताना टाकावे.चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. असी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांच्या आतील किडीसह नायनाट करावा. यापद्धतीचा 15 दिवसातुन जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या कीडीमुळे होणा-या नुकसानीचे प्रमाण कमी होते.चक्री भुग्याच्या किडीने अंडी घालु नये याकरीता सुरुवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची पावरणी करावी.पीक पेरणीच्या 30-35 दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच 7-10 दिवसात ट्रायझोफॉस 40 ई.सी.16 मिली प्रति ली. पाणी अथवा यक्लोप्रीड 21.7 एस,सी. 15 मिली प्रति 10 ली. अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल 18.5 एस.सी. 3 मिली प्रति 10 ली. अथवा थायमेथोक्झाम 12.6 % + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 % झेड. सी. 2.5 ग्रॅ. प्रति 10 सी. पाण्यात मिसळुन फवारावे.
वृत्त क्र.703
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन
लातूर दि.4 (जिमाका):- जिल्ह्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागव़ड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर खोडमासीचा प्रादुर्भाव आढळुन आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची श्यकता आहे. खोजमासीची प्रौढअवस्था म्हणजेच माशी अवस्था चमकदार काळ्या रंगाची व आकाराने लहान मह्णजेच 2 मी.मी. असते. या कीडीची अंड्यातुन निघालेली बिन पायाची अळी फिकट पिवळसर रंगांची असुन हि अंड्यासुन बाहेर पडलेल्या अळ्या प्रथम सोयाबीनची पाने पोखरतात आणि पानांच्या देठातुन झाडाच्या आतील भाग पोखरुन खातात. असा प्रकारचे प्रादुर्भावग्रस्त खोड चिरुन पाहील्यास आतमध्ये पांढुरक्या रंगाची अली किंवा कोष आढळतो.
या कीडीचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या रोपावस्थेत झाल्यास म्हणजे सोयाबीनची पेरणीनंतर 10 ते 15 दिवसाचे पिक असताना झाल्यास, प्रादुर्भाव ग्रस्त झालेले झाड वाळते व झाडाच्या ताटाच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन कधी कधी तीव्र प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणी करण्याची सुद्धा काम करु शकते व अशाप्रकारे रोपावस्थेत या कीडीचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सोयाबीनचे पीक मोठे झाल्यावर या किडीच्या प्रादुर्भावामुळे असा परिणाम दिसत नाही. खोडमाशीने कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याच्या वजनात घट होऊन उत्पादनात 16 ते 30 टक्यापर्यंत घट येऊ शकते. या प्रार्श्र्वभुमीवर सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी पुढील उपाय योजना आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर यांनी केले आहे. जेथे या कीडीचा प्रदुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट 10 टक्के दाणेदार 10 किलो प्रति हे. जमिनीत ओल असताना टाकावे. कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडगृस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. सोयाबीन पिकात खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी सोयाबीन पीक उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी प्रति हे. 25 पिवळे चिकट सापळे लावावेत. खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आद्रता, भरपुर पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात म्हणुन अशा वातावरणात पेरणीनंतर वेळोवेळी या संदर्भात जागरुक राहुन वेळोवेळी निरीक्षण घ्यावीत. पेरणीपूर्वी सोयाबीन पिकात काही कारणास्तव थायमेथोक्झामची बीजप्रक्रीया केली नसल्यास सोयाबीनचे पिक 15 दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन 50 % - 30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 % - 6.7 मिली किंवा chlorantraniliprole 18.5 % - 3.0 मिली प्रती 10 ली. पाण्यात मिसळुन फावारणी करावी.
वृत्त क्र.704
मक्यावरील नवीन लष्करी अळी (फॉल अर्मीवर्म) व्यवस्थापन करण्याचे आवाहन
लातूर दि.4 (जिमाका):- मागील काही वर्षामध्ये जिल्ह्यात मका तसेच काही प्रमाणात ज्वारी, ऊस व कापुस पिकावर नवीन लष्करी अळीचा (फॉलअर्मीवर्म) प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळुन आलेला आहे. तसेच चालु हंगामात पेरणी झालेल्या मका पिकावर देखील अल्प प्रमाणात काही ठिकाणी प्रादुर्भाव आढळुन येत आहे.
फॉल अर्मीवर्म ही कीड बहुभक्षी प्रकारची असुन 100 च्या वर वनस्पतींवर उपजिवीका करते. या कीडीचा प्रसार होण्याचा वेग खुप जास्त असुन पतंग अंड़ी देण्याअगोदर 500 किमी पर्यंत गेल्याची नोंद आहे. या कीडीचे वर्षभर जीवनचक्र चालु असते व तिच्या जीवनक्रमात सुप्तावस्था नाही. कीड ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे अळीच्या डोकाच्या पुढच्या बाजुस उलट Y आकाराची खुण असते व शरीराच्या शेवटुन दुस-या सेग्मेंट वर चौकोणी आकारात चार ठिपके दिसुन येतात व त्या ठिपक्यावर केसही आढळुन येतात. ही कीड झुंडीने आक्रमण करत असल्यामुळे काही दिवसातच पीक फस्त करते. त्यामुळे या कीडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्र्वभुमीवर मक्यावरील नवीन लष्करी अळी (फॉलअर्मीवर्म) या कीडीचा प्रदुर्भाव आढळुन आल्यास शेतकऱ्यांनी पुढील उपाय योजना करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर यांनी केले आहे.
बीज प्रक्रीया केल्यास बियाण्याचा वापर करावा. पिकाची फेरपालट करावी. वारंवार एकाच शेतात मका पीक घेण्याचे टाळावे. मका पिकाभोवती नेपियर गवत या सापळा पिकाची लागवड करावी. तसेच, मका पिकात कडधान्य वर्गीय आंतरपिकाची लागवड करावी. किडीच्या नैसर्गीक शत्रुंना आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्या संगोपनासाठी बांधावर झेंडू, कारळा, तीळ, सुर्यफुल, कोछांबीर, बडीशेप इ. लागवड करावी.पक्षांद्वारे फॉलअर्मीवर्म किडीचे नैसर्गीकरीत्या नियंत्रणाचे दृष्टीने पक्षांना आकर्षित करण्यासाठी प्रति एकरी 10 पक्षी थांबे उभारावेत. पीक पेरणीनंतर लगेच प्रति एकरी 4 कामगंध सापळे उभारुन त्यात अडकलेल्या पतंगांची नियमित पाहणी / सर्वेक्षण करावे. किडीसाठी पर्यायी यजमान पिकांची उपलब्धता होऊ नये म्हणुन शेत स्वच्छ आणि तणमुक्त ठवावे.किडीचे अंडीपुंज व नवजात समुहातील अळ्या वेचाव्यात व चिरडुन टाकाव्यात. रेती किंवा माती + चुनकळी यांचे 9:1 या प्रमाणातील मिश्रण पिकाच्या पोंग्यात सोडावे. कामगंध सापळ्यात प्रति दिन प्रति सापळा एक पतंग सापडळ्यास अथवा सापळा किंवा मुख्य पिकावर किडीचा 5 % प्रादुर्भाव दिसुन येताच 5 % निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन 1500 पीपीएम (1ली / एकर) 5 मिली प्रति लीटर पाण्यात मिसळुन पहिली फवारणी करावी. किडीचे मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासाठी प्रति एकरी 15 कामगंध सापळे लावावेत (यशस्वीरीत्या सार्वजनिकरीत्या सर्वांनी कामगंध सापळे लावावेत). अंड्यातील परोपजीवी कीटक उदा. टेलेनोमेस रिमस 4 हजार अंडी प्रति एकर अथवा ट्रायकोग्रामा प्रिटीओसम 50 हजार अंडी प्रति एकर प्रमाणे एक आटवड्याच्या अंतराने दोन वेळा प्रसारण करावे. (मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासठी कामगंध सापळे लावल्यास परोपजीवी किटकांचे प्रसारण करु नये).
किडींचा प्रादुर्भाव 5 ते 10 % पर्यंत असल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका जैविक किटकनाशकाचे द्रावण पिकाच्या पोंग्यात सोडावे. बॅसिलस थुरिनजिनसीस व्ही. कुर्सटकी (400 ग्रॅम प्रति एकर) 2 ग्रॅम प्रति ली. पाणी किंवा 1 X 10 सीएफयु/ग्रॅम इतके बिजाणुचे प्रमाण असलेले मेटा-हायझियम ॲनिसोप्लि अथवा बिव्हेरीया बासीयाणा (1 किलो/एकर) 5 ग्रॅम प्रति ली. पाणी किंवा एसएफएनपीव्ही (66 मिली/एकर) 3 मिली प्रति ली. पाणी किंवा कीडरोगजनक सुत्रकृमी (ईपीएन) (4 किलो/एकर) 20 ग्रॅम प्रति ली. पाणी. किडीची प्रादुर्भाव 10 % पेक्षा जास्त असल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकाचे द्रावण पिकाच्या पोंग्यात सोडावे. क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एस.सी. (80 मिली/एकर) 0.4 म्ली प्रति ली. पाणी किंवा थायामेथॉक्झाम 12.6 % + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 % झेड. सी. (50 मिली/एकर) 0.25 मिली प्रति ली. पाणी किंवा स्पिनेटोरम 11.7% एस.सी. (100मिली/एकर) 0.5 मिली प्रति ली. पाणी किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 % एस. जी. (80 ग्रॅम/एकर) 0.4 ग्रॅम प्रति ली. पाणी.
चारापिक म्हणून घेण्यात येणा-या मका पिकावर रासायनिक किटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. जर रासायनिक किटकनाशकाची फवारणी केली तर सेवटचा वापर व चारा पीक काढणी या दरम्यान किमान 30 दिवसांचे अंतर असल्याची खात्री करावी व त्यादृष्टीने किटकनाशकाचा वापर करताना काळजी घ्यावी.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.