*प्रमाणपत्रांचे पाचशेवर प्रस्ताव रखडले, महिना-दीड महिन्यांपासून नागरिकांची ससेहोलपट*
दि. 6 - उस्मानाबाद -
*सेतूमार्फत प्रस्ताव दाखल केल्यानंतरही तहसील कार्यालयाकडून ऑनलाईन कागदपत्रे मिळण्यास बराच विलंब लागत आहे. यामुळे पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ही कागदपत्रे वेळेत द्यावीत. अन्यथा काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाईल.*
*मोईज सय्यद, विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस*
भूम येथील तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्रामार्फत मागील दोन महिन्यांपासून दाखल सव्वापाचशेहून अधिक झालेले प्रस्ताव मंजुरीअभावी पडून आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिक दररोज तहसील कार्यालयात खेटे घालत असल्याचे चित्र आहे.
१५ जूनपासून शैषणिक वर्षास प्रारंभ झाला असला तरी नवीन प्रवेश घेण्यासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नागरिकांची धावपळ सुरू आहे. तालुक्यातील अनेक पालक, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी लागणारी विविध प्रमाणपत्रे सेतू सुविधा केंद्रामार्फत तहसील कार्यालयाकडे दाखल केली आहेत. यात प्रामुख्याने उत्पन्न राष्ट्रीयत्व, अल्पभूधारक, रहिवासी, नॉनक्रिमिलेयर, जात यासह अन्य प्रमाणपत्रांचा समावेश आहे. दरम्यान, सध्या तहसील कार्यालयात सेतूमार्फत दाखल झालेले उत्पन्न प्रमाणपत्राचे ३०२, वय, अधिवास ९२ उन्नत व प्रगतचे चाळीस तर जात प्रमाणपत्रांचे १०० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. शैक्षणिक प्रवेशाच्या अनुषंगाने ही प्रमाणपत्रे तत्काळ मिळणे गरजेचे आहे. परंतु, मागील महिनाभरापासून याला मंजुरीच मिळाली नसल्यामुळे नागरिक दररोज तहसील कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.
वास्तविक सेतू सुविधा केंद्रात विविध प्रमाणपत्र मागणीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर तेथून ते तहसील कार्यालयाकडे जातात. या कार्यालयात प्रमाणपत्राच्या प्रस्तावाचा तीन टेबलवरून प्रवास होतो. परंतु, तब्बल एक महिन्यापासून किरकोळ त्रुटी व कोरोनाचे कारण सांगत ही कागदपत्रे विलंबाने मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रत्येकवेळी विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर 'उद्या होईल, असे ठरावीक उत्तर मिळत असल्याचेही काही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे हा प्रश्न लवकर मार्गी लावून नागरिकांची गैरसो थांबवावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क झाला नाही. यामुळे तहसील प्रशासनाची बाजू कळू शकली नाही.
Web Blog👆
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*
*उस्मानाबाद रिपोर्टर महेबुब सय्यद*



0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.