*६५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत, ७८ हजार ८९९ शेतकऱ्यांना ५४२ कोटीचे कर्ज वाटप...*

 *६५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत, ७८ हजार ८९९ शेतकऱ्यांना ५४२ कोटीचे कर्ज वाटप...*








दि. - 6 - उस्मानाबाद -


*खरीप हंगामासाठी १५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेस ३२७ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या बँकेच्या विविध शाखेकडून १९ जुलैअखेर १८१ कोटी ९४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. याची टक्केवारी ५६ इतकी आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १२ हजार ८ शेतकऱ्यांना १०९ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात असून कर्जवाटपाची टक्केवारी ४१ एवढी आहे.*


जिल्हास खरीप हंगामासाठी १५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. सध्या खरीप हंगाम निम्यावर आला आहे. असे असताना केवळ ७८ हजार ८९९ शेतकऱ्यांना ५४२ कोटी ५५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ३५ टक्के इतकी आहे. अद्याप ६५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.


वर्षादोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी अशा संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा पिकांचे नुकसान झाले तर पुढील वर्षी चांगले उत्पादन मिळेल या आशेवर शेतकरी पेरणी पिके घेत असतात. शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता भासत असते. ही गरज पूर्ण व्हावी, यासाठी राज्य शासनाकडून पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी बँकांना १५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास प्रारंभ झाला. कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात एसटी बस बंद असल्याने ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना शहरातील बैंकामध्ये येता येत नव्हते. त्यामुळे कर्ज वितरणाची गती मंदावलेली होती. जून महिन्यापासून निर्बंध शिथील झाले तसेच जून महिन्यात पाऊसही झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. जून जुलै महिन्यातही कर्ज वाटपास म्हणावी तशी गती आलेली दिसत नाही.


१९ जुलै अखेरपर्यंत ७८ हजार ८९९ शेतकऱ्यांना ५४२ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ३५ टक्के इतकी असून, अद्याप ६५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.




Web Blog👆

*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 *

 *उस्मानाबाद रिपोर्टर महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या